केंद्राच्या योजनांमुळे कामगारांचे जीवनमान उंचविण्यास मदत होईल - महेश तवले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 6, 2021

केंद्राच्या योजनांमुळे कामगारांचे जीवनमान उंचविण्यास मदत होईल - महेश तवले

 केंद्राच्या योजनांमुळे कामगारांचे जीवनमान उंचविण्यास मदत होईल - महेश तवले

भाजपा युवा मोर्चाच्यावतीने बांधकाम कामगारांची विशेष नोंदणी अभियानाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी केंद्र सरकारच्यावतीने विविध योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा लाभ अनेकांना मिळत आहे. संघटीत क्षेत्रातील संघटना आपल्या मागण्यांसाठी अग्रही असतात, आंदोलनाच्या माध्यमातून ते आपले हक्क मिळवतात. परंतु असंघटीत क्षेत्रात काम करणारे अशा सरकारच्या योजनांपासून दूर राहतात.  परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंघटीत कामगारांची नोंदणी करुन त्यांनाही लाभ मिळावेत, यासाठी विशेष अशी अटल विश्वकर्मा सन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत इमारत बांधकामासह इतर बांधकाम क्षेत्रात काम करणार्यांची नोंदणी करुन त्यांनाही शासनाचे लाभ मिळणार आहेत. अशा कामगारांची नोंदणी सुलभ व्हावी, यासाठी भाजप युवा मोर्चाच्यावतीने नोंदणी अभियान सुरु केले आहे. त्यामुळे या कामगारांना सरकारी योजनांचा फायदा होणार आहे. अशा योजनांचा लाभ मिळाल्यास या कामगांरांचे जीवनमान उंचविण्यास मदत होईल. त्यासाठी या कामगारांनी भाजपा युवा मोर्चांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा युवा मोर्चा कार्यरत आहे, असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष महेश तवले यांनी केले.
भाजपा युवा मोर्चाच्यावतीने इमारत व इतर बांधकाम कामगारांची अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गंत विशेष नोंदणी अभियानाचा शुभारंभ भाजपा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या उपस्थित करण्यात आला. याप्रसंगी युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष महेश तवले, संघटन सरचिटणीस अ‍ॅड.विवेक नाईक, विशाल नाकाडे, संपत नलावडे, रवी गुडा, संतोष बुरुगणले, प्रदीप चाबुकस्वार, गोपी काकडे, प्रकाश बोराटे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी भैय्या गंधे म्हणाले, भाजपप्रणित केंद्रातील सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील लोकांसाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी सरकारी यंत्रणेबरोबर भाजपचे कार्यकर्ते काम करत आहेत. संघटीत क्षेत्रातील कामगारांना एकत्र करुन त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे या कामगार स्थैर्य प्राप्त होईल, असे सांगितले. याप्रसंगी आशिष आव्हाड, पवन चुटके, रोहित आजबे, मल्हार गंधे, ऋग्वेद गंधे, सिद्धेश नाकाडे, शाम तिवारी, सनी दुलम, यश जावळे, गिरिष तवले, संकेत जावळे, चेतन आजबे, हुजेफा शेख अभिषेक वराळे, साहिल शेख, नामदेव शिंदे, कृष्णा एडके आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment