मोदी सरकारच्या योजना शेतकर्‍यांच्या बांधावर नेणार- प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 6, 2021

मोदी सरकारच्या योजना शेतकर्‍यांच्या बांधावर नेणार- प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे

 मोदी सरकारच्या योजना शेतकर्‍यांच्या बांधावर नेणार- प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे

राज्यव्यापी शेतकरी संवाद अभियानाचा भाजपा किसान मोर्चाच्या वतीने संपन्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सात वर्षांपासून देशात भाजपची सत्ता स्थापन झाली या काळामध्ये पंतप्रधान यांनी शेतकर्‍यांसाठी घेतलेले विविध निर्णय त्याच्या बांधापर्यंत पोचविण्याचे काम भाजपा किसान मोर्चा करणार आहे. यासाठी राज्यव्यापी शेतकरी संवाद अभियानाच्या शुभारंभ आज अहमदनगर मध्ये करण्यात आला,राज्य सरकारमुळे केंद्र सरकारच्या योजना शेतकर्‍यांपर्यंत पोचण्यास उशीर होत आहे. अनेक शेतकर्‍यांना केंद्र सरकारच्या योजना पासून वंचित राहावे लागते यासाठी आता आम्ही शेतकर्‍यांच्या थेट बांधावर जाऊन जनजागृती मोहीम राबविणार आहे.केंद्रातील मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविणे आहोत याचा लाभ शेतकर्‍यांना कसा घेता येईल याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे याची घोषणा भाजपा किसन मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केली.
राज्यव्यापी शेतकरी संवाद अभियानाचा शुभारंभ नगर येथे भाजपा किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आला यावेळी प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे, भानुदास बेरड, अभय आगरकर, वसंत लोढा, सुनील रामदासी, सचिन पारखी, नरेंद्र कुळकर्णी, अमित गटने, सुनील पंडित, महेंद्र गंदे, ऋषिकेश देशमुख, सुरज कुरलीये आदी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब मुरकुटे यांची किसान मोर्चाच्या नगर जिल्हा व पुणे ग्रामीण जिल्हा किसन मोर्चाच्या प्रभारी पदी निवड करण्यात आली. याच बरोबर जिल्हाध्यक्षपदी सतिष कानवडे, संघटन सरचिटणीस पदी रोहिदास साबळे, उपाध्यक्षपदी नरेंद्र नवले, संदीप उगले, ज्ञानेश्वर पेचे, मदन चौधरी, अनिल फटागरे, विजय इनामके, भाऊसाहेब बोर्डे, सरचिटणीसपदी  -योगिता होन, संजय बोठे, सुरेश गबाळे, अनिल थोरात,साहेबाना घुगे, सचिव पदी - अविनाश कराळे, कैलास दहातोंडे, मच्छिंद्र जाधव, जनार्दन रोहम, उत्तम बडे, अमोल गोडसे, कोषाध्यक्षपदी- प्रशांत कोडीलकर, प्रसिद्धी प्रमुख पदी- कृष्णा वेताळ, नवनाथ वावरे आदीची निवड करण्यात आली.

No comments:

Post a Comment