मुस्लिम समाजाला दिलेल्या 5 आरक्षण मिळालेच पाहिजे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 6, 2021

मुस्लिम समाजाला दिलेल्या 5 आरक्षण मिळालेच पाहिजे

 मुस्लिम समाजाला दिलेल्या 5 आरक्षण मिळालेच पाहिजे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः मुस्लिम समाजाला दिलेल्या 5 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे जामखेड चे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीचे राज्य सहसमन्वयक अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव, प्रा.मधुकर राळेभात, प्रा. शहाजी डोके, अवधूत पवार, कुंडल राळेभात यांच्यासह मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी अजहर भाई काझी, खलील मौलाना, सय्यद मुख्तार, शेख जुबेर, शेख मोईन, इमरान कुरेशी, सलीम बागवान, सय्यद इस्माईल, गफ्फार कुरेशी, वाजिद खान पठाण, गफूर शेख, लियाकत शेख, जाफर सय्यद, आतिष पारवे, अजिनाथ शिंदे, विशाल पवार, अरुण डोळस, सूर्यकांत सदाफुले, संजय सदाफुले, प्रा. विकी धायतडक आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण मिळावे म्हणून . या आंदोलनास पाठिंबा म्हणून जामखेड येथे तहसिल कार्यालयासमोर प्रतिकात्मक स्वरूपात आंदोलन करण्यात आले.
मुस्लिम समाज हा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. या समाजाकडे शेती नाही. मोठे उद्योग व्यवसाय नाहीत. त्यामुळे हा समाज दुचाकी व चारचाकी वाहनांची दुरुस्ती, रंगकाम, बेकरी व्यवसाय, भंगार गोळा करणे, वेल्डिंग अशी छोटी मोठे कामे करून आपला उदरनिर्वाह करतो. या सर्व कामातून मुस्लिम कुटुंबाला अत्यंत तुटपुंजे उत्पन्न मिळते. यामुळे मुस्लिम समाजाची प्रगती होत नाही. म्हणून हा समाज मागासलेला राहिला आहे. शासकीय सर्व्हे नुसार मुस्लिम समाज हा गरीब व मागासलेला आहे. त्यामुळे शासनाने मराठा समाजासोबतच मुस्लिम समाजालाही 5 टक्के आरक्षण जाहीर केले होते. मुस्लिम समाज आरक्षणास कोर्टात जनहित याचिका दाखल करून आव्हान करण्यात आले होते. तरीही कोर्टाकडुन मुस्लिम समाज आरक्षण मान्य केले गेले. मात्र मागील फडणवीस सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. म्हणून मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले नाही. तरी आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण द्यावे. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले.मुक्तार सय्यद यांनी सूत्रसंचालन केले.तर इस्माईल सय्यद यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment