सुजीत झावरे पाटील यांनी उभे केले आदिवासी भागात विकासाचे जाळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, July 6, 2021

सुजीत झावरे पाटील यांनी उभे केले आदिवासी भागात विकासाचे जाळे

 सुजीत झावरे पाटील यांनी उभे केले आदिवासी भागात विकासाचे जाळे

आदिवासी पट्ट्यात अनेक विकासकामे मार्गी; वासुंदे येथे शिक्री ते ठाकरवाडी रस्त्याचे भूमिपूजन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पारनेर तालुक्याचे सुसंस्कृत नेतृत्व सुजित झावरे पाटील यांनी तालुक्यातील उत्तर भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहतो या समाजाचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे.  स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे अनेक प्रलंबित प्रश्न आतापर्यंत मार्गी लागले. त्यांचाच वारसा पुढे चालवणारे तालुक्याचे सुसंस्कृत युवा नेतृत्व सुजीत झावरे पाटील हे आता आदिवासींच्या प्रश्नांवर  व समस्यांवर काम करत आहेत.  झावरे पाटील कुटुंबांने या भागातील अनेक आदिवासी समाजातील युवकांना व महिलांना जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती आशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्व करण्याची संधीच दिली आहे.  
सुजीत झावरे पाटील यांनी आज  पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे त्यांच्या विशेष प्रयत्नातून अहमदनगर जिल्हा परिषदेच्या  माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या वासुंदे येथील शिक्री ते ठाकरवाडी 20 लक्ष रुपये रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन  वासुंदे येथे केले.  वरील कामाचे भूमिपूजन शासकीय नियमांचे पालन करून  करण्यात आले. यावेळी बोलताना सुजीत झावरे पाटील म्हणाले की माझे वडील स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील यांनी नेहमीच आदिवासींच्या  प्रश्नांना महत्त्व दिले  व त्यांचे  प्रश्न सोडवण्यासाठी आपले पूर्ण जीवन वेचले त्यांच्या विचारांना आदर्श ठेवून मी आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. पारनेर तालुक्यातील उत्तर भागातील आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवत असताना व त्यांच्या समस्यांवर काम करत असताना झावरे पाटील कुटुंबाने व मी नेहमीच  त्यांच्यासाठी विकासात्मक काम करून त्यांच्या प्रगतीचा विचार केला आहे. यावेळी  प्रगतिशील शेतकरी भाऊसाहेब सैद, उपसरपंच शंकरराव बर्वे, रणजित काका पाटील, दिलीपराव पाटोळे, बाळासाहेब झावरे, लहानभाऊ झावरे, सुदाम शिर्के, दत्तू बर्वे, विलास साठे, तुकाराम झावरे, कोंडीभाऊ मधे, सचिन सैद, तळेकर गुरुजी, बाळासाहेब टोपले, सचिन साठे, हरिभाऊ दुधवडे, बबन वारे, नंदू वारे, जनार्दन केदार, पोपट केदार, सुभाष केदार, बन्सी केदार, संतोष केदार, योगेश केदार, कोंडिभाऊ मधे सर, कुशाबा दुधवडे, बाळू केदार, दादाभाऊ मधे, नामदेव केदार, अरुण केदार, बाबुराव गुंजाळ, अमोल पोटघन, शरद सैद, बाळशिराम सैद, सुरेश सैद, ठुबे सर, तळेकर गुरुजी, योगेश शिंदे, अशोक शिंदे, बन्सी शिंदे, नितीन शिंदे, विजय सैद तसेच ठाकर समाजातील बांधव तसेच वासुंदे सरपंच, उपसरपंच  ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ याठिकाणी उपस्थित होते. हा कार्यक्रम सर्व शासकीय नियमांचे पालन करून होणार आहे. पारनेर तालुक्यातील उत्तर भागातील आदिवासी पट्ट्यामध्ये सुजीत झावरे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकास कामे राबवली आहेत. विकासकामांना प्राधान्य देत ग्रामीण भागांमध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी सुजीत झावरे पाटील नेहमी प्रयत्नशील आहेत.  आपल्याजवळ कोणतीही सत्ता नसताना विकासकामांचा तालुक्यात सुजित झावरे पाटील यांनी डोंगर उभा केला आहे. वासुंदे येथील शिक्री ते ठाकरवाडी रस्त्याचा  काम मार्गी लावून. आदिवासी समाजाचा प्रश्न सोडवला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here