पोलीस निरिक्षक राजेंद्र सानप यांचे कार्य कौतुकास्पद : अ‍ॅॅड. सुरेश लगड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 6, 2021

पोलीस निरिक्षक राजेंद्र सानप यांचे कार्य कौतुकास्पद : अ‍ॅॅड. सुरेश लगड

 पोलीस निरिक्षक राजेंद्र सानप यांचे कार्य कौतुकास्पद : अ‍ॅॅड. सुरेश लगड


अहमदनगर ः
सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत पोलीस अधिकारी व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कर्त्यव्य बजावत आहे. करोना मुळे पोलिसांवर अतिरिक्त भार पडला असतानांही ते उत्कृष्ट पणे काम करत आहेत. नगर तालुका पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पोलीस निरिक्षक राजेंद्र सानप यांनीही उत्कृष्ट काम केले असल्यानेच जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी नगर तालुका पोलीस स्टेशनची उत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून निवड करत त्यांच्या कार्याची दाखल घेतली आहे. पोलीस निरिक्षक राजेंद्र सानप यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील सुरेश लगड यांनी केले.
तालुका पोलीस स्टेशनचे निरिक्षक राजेंद्र सानप यांचा विशेष सरकारी वकील सुरेश लगड यांनी सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके उपस्थित होते. पोलीस निरिक्षक राजेंद्र सानप म्हणाले, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. नगर तालुका पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या चांगल्या टीम वर्क मुळे सर्व स्तरावर चांगले काम करू शकलो. सरकारी वकील सुरेश लगड यांनी केलेला सत्कार प्रेरणादायी आहे, असे सांगितले.

No comments:

Post a Comment