आगडगाव देवस्थानचा जिल्ह्यात नावलौकिक : शेळके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 6, 2021

आगडगाव देवस्थानचा जिल्ह्यात नावलौकिक : शेळके

 आगडगाव देवस्थानचा जिल्ह्यात  नावलौकिक : शेळके

माजी उपसभापती भापकर यांच्या शेष निधीतून आगडगाव देवस्थानसाठी 5 लक्ष रुपये.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः भापकर यांनी एक वर्ष उपसभापती म्हणून कार्य करताना नगर तालुक्यातील अनेक गावात भरीव निधी दिला आहे. आगडगाव भैरवनाथांचे जागृत देवस्थान म्हणून जिल्ह्यात मोठा नावलौकिक मिळवत असून  त्यासाठी निधी देण्याचा निर्णय माजी उपसभापती रवींद्र भापकर घेतला असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांनी केले.
   नगर तालुका पंचायत समितिचे माजी उपसभापती रविंद्र भापकर यांच्या शेष निधीतुन आगडगाव (ता.नगर ) देवस्थान येथे शौचालय व इतर आरोग्यविषयक कामासाठी 5 लक्ष रुपये देण्यात आले,. या कामाचा शुंभारभ जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके याच्या हस्ते नुकताच पार पडला यावेळी ते बोलत होते.
 यावेळी जिल्हा परिषद सदस्य  शरद  झोडगे, गोविंद मोकाटे, संदेशजी कार्ले, बाळासाहेब हराळ, रामदास भोर, प्रविण कोकाटे,शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत,आगडगावचे सरपंच मच्छीन्द्र कराळे,उपसरपंच  संतोष शिरसाठ, ग्रामसेवक पोपट गावडे,देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बलभीम कराळे,साहेबराव गायकवाड, नितीन कराळे, प्रल्हाद खाडे, दिपक गुगळे, बाबासाहेब बोरुडे, दिलीप गायकवाड, संभाजी कराळे, भाऊसाहेब पालवे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य गोविंद  मोकाटे यांनी मनोगत व्यक्त केले, उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांनी अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करताना देवस्थान साठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले,देवस्थानसाठी भविष्यात मोठा निधी उपलब्ध करून देऊ आणि आपण सर्वजण त्यासाठी कटीबद्ध राहू असेही शेळके म्हणाले, उपस्थित सर्वांनी रविंद्र भापकर यांच्या कामाचे भरभरुन कौतुक केले.

No comments:

Post a Comment