चष्मा व दृष्टीदोष असलेल्या नेत्ररूग्णांसाठी लेसर नेत्रशस्त्रक्रिया शिबीर - डॉ. कांकरिया - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 24, 2021

चष्मा व दृष्टीदोष असलेल्या नेत्ररूग्णांसाठी लेसर नेत्रशस्त्रक्रिया शिबीर - डॉ. कांकरिया

 चष्मा व दृष्टीदोष असलेल्या नेत्ररूग्णांसाठी लेसर नेत्रशस्त्रक्रिया शिबीर - डॉ. कांकरिया

नगरी दवंडी/प्रिंतनिधी



अहमदनगर ः
चष्मा व दृष्टीदोष असलेल्यांना आयुष्यात बर्याच समस्या येतात. युवकांना सैन्यात जाणे, पोलिस भर्ती रेल्वे व सरकारी नोकर्या, व्यक्तीमत्व निगडीत व्यवसाय अशा अनेक संधी सोडून दयाव्या लागतात तर युवतींना चष्मा असल्यामुळे लग्नास नकार मिळाल्यामुळे आयुष्यात मोठे संकट उभे राहते. अंधत्व निवारणा बरोबरच समाजाची ही मोठी समस्या लक्षात घेऊन अहमदनगरला डॉ. प्रकाश व डॉ. सौ. सुधा कांकरिया ह्यांनी 35 वर्षांपूर्वी 15 ऑगस्ट 1985 ला साई सूर्य नेत्रसेवा ह्या अत्याधुनिक लेसर नेत्रशस्त्रक्रिया व उपचार संस्थेची उभारणी करून भारतास आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून दिला. मागील 35 वर्षात लाखापेक्षाही अधिक लेसर नेत्रशस्त्रक्रिया यशस्वी करून लिम्का व गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये आपले नाव कोरले फोर्ब्स ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे ही डॉ. कांकरियांना आंतरराष्ट्रीय सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
15 ऑगस्ट ह्या भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व साई सूर्य नेत्रसेवा ह्या संस्थेच्या 36 व्या वर्धापन दिनी अशा युवकांसाठी चष्मा घालविण्याचे लेसर नेत्रशस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ह्यात जगातील सर्वात प्रगत कॉन्टूरा लेसर तंत्रज्ञानाचा उपयोग अतिशय सवलतीत उपचारासाठी वापरण्यात येणार असून ही मोठी सुवर्ण संधी नेत्ररूग्णांना उपलब्ध केली जाणार आहे. -0.50 ते -32.0 तर +18.0 पर्यंतचे सर्व प्रकारचे नंबर घालविण्यासाठी एकूण 15 प्रकारच्या उपचार पध्दती एकाच छताखाली असणारी साई सूर्य नेत्रसेवा अहमदनगर ही भारतातील पहिलीच संस्था ठरली आहे. एकाच दिवसात शंभरापेक्षाही जास्त लेसर लॅसीक लेसर नेत्रशस्त्रक्रिया करणारे डॉ. प्रकाश कांकरिया हे जगातील पहिले नेत्रतज्ञ असून आजपर्यंत 50 वेळा असा पराक्रम करणारे ते जगातील एकमेव नेत्रतज्ञ आहेत. ह्या शिबीरातील नेत्ररूग्णांची नेत्रतपासणी लेसर नेत्रशस्त्रक्रिया 14 व 15 ऑगस्ट 2021 (शनिवार व रविवार) करोना ह्या संसर्गाची संपूर्ण काळजी घेऊन करण्यात येणार असून ह्या शिबीरामध्ये डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. वर्धमान कांकरिया ह्यांची निष्णात टीम उपचार करणार असून ज्यांना चष्मा व दृष्टीदोष आहे अशा नेत्ररूग्णांनी दिनांक 10 ऑगस्ट पूर्वी 9112288611/8888982222 या दूरध्वनीवर नावनोंदणीसाठी संपर्क करणे आवश्यक आहे असे प्रशासकीय अधिकारी श्री केदार ह्यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment