पदोन्नती मिळालेल्या पोलिस कर्मचार्‍यांचा संदीप मिटके यांच्या हस्ते सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 24, 2021

पदोन्नती मिळालेल्या पोलिस कर्मचार्‍यांचा संदीप मिटके यांच्या हस्ते सत्कार

 पदोन्नती मिळालेल्या पोलिस कर्मचार्‍यांचा  संदीप मिटके यांच्या हस्ते सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राहुरी  पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांचा पदोन्नती मिळाल्या बद्दल डीवायएसपी संदीप मिटके, आय. नंदकुमार दुधाळ यांच्या हस्ते सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्यात. थेट डीवायएसपी साहेबांनीच पदोन्नती मिळालेल्या कर्मचार्‍यांच्या खांद्यावर स्टार लाऊन दिल्यामुळे कर्मचार्‍याच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. पीएसआय वाघ यांनी प्रास्तविक केले, एएसआय. ढाकणे, एएसआय. गायकवाड, राठोड, चव्हाण, गुंजाळ, साखरे यांनी भावना व्यक्त केल्या तर कोहकडे यांनी आभार मानले.
पदोन्नती मिळालेले पोलीस कर्मचारी खालील प्रमाणे ः
हवालदार ते सहाय्यक पोलीस निरीक्षक ः नारायण यादवराव ढाकणे, चंद्रकांत निवृत्ती बर्‍हाटे, संजय यशवंत शिंदे
नाईक ते हवालदारपदी बढती मिळालेले ः योहान शांतवन सरोदे, आदिनाथ भगवान बडे, वाल्मीक दादाभाऊ पारधी, संजय शंकर कारेगावकर, सोमनाथ भगवान जायभाय संजय बाबुराव राठोड, दिनकर राजाराम चव्हाण, विठ्ठल न्हनू राठोड
पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस नाईक ः उत्तरेश्वर सोमनाथ मोराळे, मंजुश्री सुभाष गुंजाळ, जालिंदर धनाजी साखरे, शाहमद शब्बीर शेख, गणेश भरत सानप.

No comments:

Post a Comment