शेतकर्‍याचा प्रीप्लॅन मर्डर.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 12, 2021

शेतकर्‍याचा प्रीप्लॅन मर्डर..

 शेतकर्‍याचा प्रीप्लॅन मर्डर..

बेलवंडी पोलिसांनी 2 तासातच हत्येचे गूढ उकलले...

सख्ख्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल...


श्रीगोंदा -
बेलवंडी, शिरूर रस्त्यावर एक छोटसं गाव आहे देवदैठण... विशेषतः पुराणकालीन मंदिराचा वारसा असणारं हे गाव. राजकीय व सामाजिक दृष्ट्या शांत असणार्‍या या गावात काल सकाळी कुकडी कॉलनी जवळ एक मृतदेह आढळला. नी गावात खळबळ उडाली. बेलवंडी पोलीस ठाण्याला याबाबत कळविण्यात आले असता पोलिसांनी श्वानपथक, फॉरेन्सिक टीम, फिंगर एक्सपर्ट, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला सुरुवात केली. आणि उघड झाला एक प्रीप्लॅन मर्डर. पिंपळनेर ता. पारनेर येथील पांडुरंग जयवंत पवार (वय 52) या शेतकर्‍याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांनी काही तासातच या खुनाचे धागेदोरे शोधून चार जणांना अटक केली. या तीन आरोपीत मयताचा सख्खा भाऊ असून शेतातील वादामुळे ही हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय आहे.
शनिवारी रात्री झालेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी मृताच्या सख्ख्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल केला. त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांडुरंग पवार यांचा शंकर पवार या सख्ख्या भावाशी जमिनीचा वाद होता. शनिवारी सकाळी पाडूरंग पवार हे दत्तात्रय भाऊसाहेब लटांबळे, शिवदास श्रीधर रासकर, शंकर काशिनाथ जकटे (रा. पिंपळनेर) या मित्रांबरोबर सायंकाळी सूपा येथील हॉटेलवर मद्यपान केले. त्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील पाहुण्यांकडे आले. माघारी जाताना ढवळगाव येथील हॉटेलमध्ये पुन्हा मद्यपान केले. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घरी जाताना देवदैठण येथील एरिगेशन कॉलनीसमोर तिघांनी पवार यांचा खून केला.
मृत पवार यांचा मुलगा सागर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंकर जयवंत पवार, दत्तात्रय भाऊसाहेब सांगळे, शिवदास श्रीरंग रासकर व काशिनाथ जेक्टे या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यातील शंकर पवार वगळता इतर तिघांना अटक केली आहे. देवदैठण येथे आज सकाळी फिरायला निघालेल्या राजेंद्र कौठाळे, अमोल कौठाळे यांनी मृतदेह पाहिला. त्यानंतर बेलवंडी पोलिसांशी संपर्क साधला मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात वापरलेली मोटारही ताब्यात घेतले आहे. फिर्यादीत हा गुन्हा शेतीच्या वादातून झाल्याचे म्हटले असले तरी पोलीस सगळ्या बाजूंनी तपास करीत आहेत.
मयताच्या डोक्यातील जखम ही गोळीची आहे. की तीक्षण हत्याराची हे उत्तरीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान आरोपींसह जयंत पवार हे काल शनिवारी रात्री बेलवंडी येथे जेवणासाठी आले होते. घरी परतताना हा खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. घटनेची माहिती समजताच अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपाअधीक्षक अण्णासाहेब जाधव, बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, उपनिरीक्षक प्रकाश बोराडे यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. नगर येथील श्वान फॉरेन्सिक लॅब टीम, फिंगरप्रिंट पथकांनी घटनास्थळाची पाहणी केली.  बेलवंडी पोलिसांनी ढवळगाव येथील काही ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज तपासल्यावर मृत व तीन आरोपी एकत्र असल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलिसांचा तपास पुढे सरकला शेतीच्या वादाची किनार असल्याचा संशय व्यक्त होत असला तरी यात जर गोळी घालून खून केल्याचे निष्पन्न झाले.

No comments:

Post a Comment