बहादूरगड (धर्मवीरगड) संवर्धनासाठी प्रयत्न करणार-खासदार सुजय विखे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 12, 2021

बहादूरगड (धर्मवीरगड) संवर्धनासाठी प्रयत्न करणार-खासदार सुजय विखे

 बहादूरगड (धर्मवीरगड) संवर्धनासाठी प्रयत्न करणार-खासदार सुजय विखे

छत्रपती संभाजी महाराजांच्या मरणयातनांची साक्ष असलेल्या, पेडगावच्या बहादूरगडास खा. विखे यांची भेट.


श्रीगोंदा -
छत्रपती संभाजी महाराजांना खांबांना बांधून मरणयातना देणारा पेडगावचा “बहादूरगड” सध्या कोसळला असून पुरातन खात्याचे या किल्ल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. किल्ल्याच्या संरक्षण भिंती जमीनदोस्त झाल्या असून काही दगडी भग्न अवशेष आजही कोसळण्याच्या मार्गावर आहेत. खासदार सुजय विखे यांनी या बहादूरगडाला भेट देऊन पाहणी केली व किल्ल्या संदर्भात लक्ष देण्याचे मान्य केले आहे. ऐतिहासिक पेडगाव किल्ल्यात आवश्यक असणार्‍या लाईटची व रस्त्याची विनंती सुजयदादांनी लगेच मान्य केली. तसेच पेडगाव व किल्ल्यातील इतर कामे लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले.
श्री शिवदुर्ग संवर्धन व टीम धर्मवीरगड किल्यात संवर्धन कार्य करत आहे त्याची खा विखे यांनी माहिती घेतली.श्री शिवदुर्ग संवर्धन तर्फे 7 वर्षांपासूनच्या संवर्धन कार्याचा आढावा घेतला.पेडगावमध्ये व किल्यात रस्ते व इतर सुविधा नसल्याने किल्ला दुर्लक्षित राहिला आहे. समिती मार्फत संवर्धन कार्य येथे चालू आहेत.परिणामतः किल्यात आज पर्यटकांचा वावर वाढत आहे.किल्ल्यावरील दिवाबत्तीसाठी लाईटची व्यवस्था व रस्ते हे मुख्य विषय आहेत.उपसभापती वैभव दादा पाचपुते,निलेश खेडकर व राजेश बाराते यांनी निवेदनाद्वारे किल्यातील लाईटची व्यवस्था होण्यासाठी डी.पी.डी.सी अंतर्गत मंजुरी मिळालेल्या नवीन रोहित्रासाठी निधी उपलब्ध करावा,मुख्य रस्ता ते भैरवनाथ मंदिर हे 1 कि.मी अंतराचा 2 पदरी रस्ता व्हावा तसेच किल्ल्यामध्ये भैरवनाथ मंदिर ते बालेकिल्ला 1 कि.मी 20 फूट रुंद काँक्रीट रस्ता व्हावा यासाठी खा विखेंना निवेदन दिले. पेडगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच पती भगवान कणसे, उपसरपंच देविदास शिर्के,इरफान काझी,नारायण कणसे, जंजिरे सर,संतोष खेडकर,बाळासाहेब नवले व ग्रामस्थ यांनी मुख्य रोड ते भैरवनाथ मंदिर, पेडगाव-श्रीगोंदा, पेडगाव-अजनुज हे रस्ते व गडाचा पर्यटन क्षेत्रामध्ये समावेश करावा अशी मागणी केली. यावेळी दक्ष नागरिक फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी जगताप व नारायणराव ढाकणे यांनी उत्तर प्रदेश मधील महिलेस तिच्या घरी सुखरूप पोहोच करून केलेल्या सामाजिक कार्यासाठी खा विखेंनी यांनी त्यांचा गौरव केला.
पोलिस मित्र संघटनेतर्फे दिवंगत अमोल रणसिंग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ धर्मवीरगडावर खासदार सुजय दादा विखे पाटील,उपसभापती वैभवदादा पाचपुते,प्रतापराव पाचपुते,सरपंच विजय शेंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण केले.वृक्षारोपणासाठी पोलीस मित्र राजेंद्र राऊत व त्यांच्या सहकारी मित्रांनी सहाय्य केले.दुर्गसेवक डॉ.निलेश खेडकर  यांनी मुलगी समृद्धीच्या वाढदिवसानिमित्त 5 वटवृक्ष  व ठिबकसिंचन नलिका सेट किल्ल्यास सुपूर्द केला. पेडगाव ग्रामस्त यांच्यातर्फे सुजयदादांचा सन्मान करण्यात आला.गडावरील कार्यक्रमाचे नियोजन उपसभापती वैभवदादा पाचपुते,चेअरमन रोहिदास पवार,सरपंच भगवानराव कणसे,गणेश झिटे,डॉ.निलेश खेडकर,प्रा.राजेश बाराते,पोलीस मित्र राजेंद्र राऊत,श्री.शिवदूर्ग संवर्धन व पेडगाव ग्रामस्थ यांनी केले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अण्णासाहेब शेलार, उपसभापती वैभव दादा पाचपुते,बाळासाहेब गिरमकर,सभापती सिद्धेश्वर देशमुख,प्रतापराव पाचपुते, सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर, अजित जामदार,खासदार साहेबांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर विखे पाटील ,हजारे साहेब,शंकर उजारे, चेअरमन रोहिदास पवार, गणेश झिटे,दादासाहेब शिर्के,माणिक झिटे सर,ऊत्तम अधोरे,सतिष नवले,क्षीरसागर गुरुजी,गोवर्धन नवले, हसन शेख,इरफान पिरजादे,दत्ताजी जगताप, नारायणराव ढाकणे,सिद्धार्थ खेडकर, रोहित कणसे,अशोक गोधडे, अक्षय जंजिरे,भरत गिरमकर,लाला अवचर,अक्षय गोलांडे,पार्थ काराळे,किरण कवडे,प्रतीक पाचपुते,महेश खेडकर,गडपाल भाऊ घोडके,नंदू क्षीरसागर, मचिंद्र पंडित पेडगाव ग्रामस्थ व परिसरातील शिवशंभू भक्त मोठ्या प्रमाणात हजर होते.

No comments:

Post a Comment