गावठी हातभट्ट्यांवर छापे.
अवैद्य गावठी दारू धंद्यावाले; तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्यांच्या रडारवर...
6 जणांवर गुन्हे दाखल.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील अवैध धंद्याच्या विरोधात पोलिस प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली असून काल दिवसभरात कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलिसांना तपोवन रोडवरील दळवी मळा, तोफखाना परिसरातील सोळातोटी कारंजा, पंचरंगी गल्ली, नेप्ती नाक्यावर जवळील विहिरी समोरील काटा वनात, माळीवाडा परिसरातील साठे वस्ती, कायनेटिक चौकातील परिसरात, ढवण वस्ती परिसरातील गावठी दारू बनविणार्या हातगाड्यांवर छापा मारून देशी दारूचे साठे जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत.
शहरातील विविध भागात गावठी दारु बनविणार्या हातभट्ट्यांवर छापे मारत 88 लीटर दारु, देशी दारुच्या सीलबंद बाटल्या जप्त करून तोफखाना पोलिसात चार व कोतवाली पोलिस ठाण्यात दोन अशा सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तपोवन रोडवरील दळवी मळा, तोफखाना परिसरातील सोळातोटी कारंजा, पंचरंग गल्ली, नेप्ती नाक्याजवळ बारवासमोरील काटवनात आदी चार ठिकाणी पोलिसांनी छापे मारुन 7 हजार रुपये किंमतीची 70 लीटर हातभट्टी दारु जप्त केली आहे. या प्रकरणी आकाश बाळासाहेब ठोंबे (रा.वारुळाचा मारुती मंदिराजवळ, नालेगाव), महादू होमाजी औशीकर (रा.विठ्ठलवाडी, औशीकर वाडा, दातरंगे मळा), लतिफ दाऊत शेख (रा.कौलारु कॅम्प, सर्जेपुरा) व शिवाजी पोपट नायकोडी (रा.ढवणवस्ती, तपोवन रोड) या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस नाईक प्रदीप बडे, पोलिस हवालदार सतिश त्रिभुवन, निलेश ससे यांनी याप्रकरणी फिर्यादी दिल्या आहेत. कोतवाली पोलिसांनी साठेवस्ती माळीवाडा परिसरात व कायनेटीक चौक परिसरात छापे मारुन हातभट्टी व देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलिस हवालदार सुमित सदाशिव गवळी यांच्या फिर्यादीवरुन हेमंत शिवाजी सुरे (रा. मल्हार चौक, रेल्वे स्टेशनजवळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिस हवालदार भारत मनोहर इंगळे यांच्या फिर्यादीवरुन बाबासाहेब कोंडीराम वैरागर (रा.साठे वसाहत, माळीवाडा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलिस नाईक शाहीद शेख, नितीन शिंदे, गणेश धोत्रे, भारत इंगळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
तसेच, ढवणवस्ती येथील एका बंद टपरीच्या आडोशाला छापा मारुन तोफखाना पोलिसांनी चेन्नई मटका चालविणार्या एकावर कारवाई केली आहे. या प्रकरणी जितेश राजू धोत्रे (रा. गुंडू गोडाऊनमागे, तपोवन रोड) याच्या विरोधात पोलिस नाईक प्रदीप बडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment