मनसेचा महावितरणला झटका - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 7, 2021

मनसेचा महावितरणला झटका

 मनसेचा महावितरणला झटका

वाडेगव्हाणमध्ये वाढीव वीज बिल व विद्युत पुरवठा खंडित केल्याने जाब विचारताच विद्युत पुरवठा झाला सुरळीत


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील गावठाण  दलित वस्तीमध्ये हातावर पोट असणार्या महिला व नागरिकांनी  महाराष्ट्र नवनिर्मिन सेनेचे  तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांना महावितरण कंपनीच्या अधिकार्‍याकडून पिळवणूक केली जात असल्याची माहिती दिली. पवार यांनी समक्ष भेट देऊन या कुटुंबाच्या व्यथा पाहील्या असता थेट महावितरणच्या अधिकार्‍याला मनसे स्टईलने जाब विचारताच या कुटुंबाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.
. लॉकडाऊनच्या काळात गेली तीन चार महिन्यात महावितरण कडून वीज बिल दिलेच नाही. दि.3 जुलै रोजी विज बिल हातात दिले व दि.4 रोजी संबंधित कुटुंबाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. अविनाश पवार यांनी वाडेगव्हाण येथील महिला भगिनी व नागरिकांना आश्वासन दिले की जर असा अन्याय झाला असेल तर महावितरण ला मनसे स्टाईल दणका देणार त्यानुसार मंगळवार दि.26 रोजी दुपारी 1 वाजता वाडेगव्हाण येथील गावठाण दलित वस्तीमध्ये हातावर पोट असणार्या महिला व नागरिकांवर का अन्याय करत आहात व जी  चुक लाईट बिल वाटणार्या ठेकेदाराने केली तीचा भार सर्व सामान्य गोरगरीब जनतेनी का भरावा व  नागरिकांना वेठीस धरु नये.
महावितरणचे सहायक अभियंता मापारी यांनी लगेच संबंधित ठेकेदाराला फोन करून खडसावले व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आश्वासन दिले लगेच विद्युत पुरवठा सुरळीत केला जाईल. व वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देऊन वाढीव बील देखील कमी करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन म्हस्के, तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार, सुपा शहर अध्यक्ष अक्षय सुर्यवंशी; सहकार सेनेचे सचिव राजु अवचिते, अविनाश बोरगे, रमेश बोरगे, कचराबाई साळवे, चंद्रकांत सोनवणे, कादर शेख, विलासराव बोरगे, हिरामण बोरगे, सचिन साळवे, अनिता भिंगारदिवे,  दशरथ सोनवने, शांताबाई लोखंडे, सुरेखा लवंगारे आदी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment