साठवण तलावावर सोलर वीजनिर्मिती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 8, 2021

साठवण तलावावर सोलर वीजनिर्मिती

 साठवण तलावावर सोलर वीजनिर्मिती

नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः  भाजपाचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील व खा.डॉ श्री.सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगरपंचायतीची विविध विकास कामे सुरू असून  नुकताच नगरपंचायतीचे साठवण तलावावर शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. यामुळे शिर्डी नगरपंचायतीच्या विजबिलावर असलेला मोठा भार कमी होणार आहे आज या प्रकल्पाला नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष सचिन कोते, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, गटनेते अशोक गोंदकर, ऍड.अनिल शेजवळ, मा उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, मंगेश त्रिभुवन, अशोक गायके आदी लोकप्रतिनिधीसह एबीपी माझाचे पत्रकार नितीन ओझा, मनोज गाडेकर आदीनी भेट देऊन कामाची पाहणी केली.

No comments:

Post a Comment