प्रदुषण आयुक्तांनी केली हनुमाननगर शाळेची पाहणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 8, 2021

प्रदुषण आयुक्तांनी केली हनुमाननगर शाळेची पाहणी

 प्रदुषण आयुक्तांनी केली हनुमाननगर शाळेची पाहणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
खरवंडी कासार ः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे आयुक्त  दिलीप खेडकर  यांनी  हनुमाननगर (भारजवाडी) शाळेला भेट दिली. स्वतःच्या भालगाव गावच्या शाळेच्या विकासाचे काम प्रगतीपथावर असून काहीतरी नवीन कल्पना मिळावी, नाविन्यपूर्ण बाबी माहीत व्हाव्यात यासाठी  हनुमाननगर (भारजवाडी) शाळेला भेट दिली. शाळेच्या भौतिक, गुणात्मक बाबींची व नाविण्यपूर्ण उपक्रमांची काळजीपूर्वक पाहणी केली.  नाविण्याचा ध्यास घेवून परिवर्तनाची वाट चोखंदळतो ही बाबच खूप प्रेरणा देणारी आहे.
त्यांनी सुमारे दोन तास आपला अमुल्य वेळ हनुमाननगर शाळेला दिला शिक्षकांना व पालकांना त्यांच्या दोन तासाचा सहवास बरच काही देवून गेला.  प्रदुषण आयुक्त दिलीप खेडकर  हनुमाननगर (भारजवाडी) शाळेचे पालकांचे व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले. या शाळेच्या पालकांचा मला हेवा वाटतो त्यांच्या सहकार्यातूनच ही शाळा नावारूपाला आली आहे असे त्यांनी आवर्जुन नमूद केले.
हनुमाननगर (भारजवाडी) शाळेला पाहिजे ती मदत करायला मी कधीही तयार आहे मात्र यासाठी माझी एक अट आहे. येथील शिक्षक व पालकांनी माझ्या गावातील पालकांचे प्रबोधन करावे त्यांना चांगल्या कार्यासाठी प्रेरीत करावे अशी इच्छा दिलीप खेडकर यांनी व्यक्त केली. ही शाळा तुम्ही आदर्श बनवली म्हणजे तुमचे काम झाले असे नाही, तर परिसरातील इतर शाळा कशा आदर्श होतील याकडेही आपण शिक्षक म्हणून प्रयत्नशील असायला हवे असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी त्यांच्या समवेत तुकाराम खेडकर, गहिनीनाथ खडेकर गुरुजी, संजय बेद्रे, सोनू खेडकर, पियुष खेडकर, बाळराजे, तुकाराम केदार आदी मंडळी उपस्थित होती. हनुमाननगर (भारजवाडी) शाळेचे अशोक बटुळे, बाबु दराडे, सुखदेव बटुळे शिवाजी बटुळे, रेवणनाथ शेकडे, नितीन बटुळे,अमोल बटुळे व राघू जपकर सर आदी पालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here