वीरशैव गवळी समाजाने केला वृक्षारोपणाचा संकल्प - लालबोंद्रे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 5, 2021

वीरशैव गवळी समाजाने केला वृक्षारोपणाचा संकल्प - लालबोंद्रे

 वीरशैव गवळी समाजाने केला वृक्षारोपणाचा संकल्प - लालबोंद्रे

भिंगार येथील वीरशैव गवळी समाजाच्या स्मशानभूमीत वृक्षारोपण व सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल ढासळत चालल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे तसेच ऋतुमानात ही बदल होत असल्यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत चालला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे वृक्षारोपण व त्याचे संवर्धन होय.यासाठी नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे याच पार्श्वभूमीवर भिंगार येथील वीरशैव गवळी समाजाने सामजिक दृष्टिकोनातून पुढे येऊन स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. याच बरोबर स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी समाजातील नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.त्यामुळे या स्मशानभूमीत स्ट्रीट लाईट,वृक्षारोपण करण्यात येणार आहे. वृक्षारोपण व त्याचे संवर्धन एक लोकचळवळ व्हावी यासाठी गवळी समाजामध्ये जनजागृती सुरू केली आहे त्यामुळे समाजाचे सामाजिक कर्तव्य समजून आम्ही सर्वजण वृक्षारोपण आला महत्त्व देतो,त्यामुळे भविष्यात नागरिकांचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होईल, वृक्ष आपल्याला मोफत सुद्धा ऑक्सिजन देण्याचे काम अहोरात्र करत असतो. कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता त्यामुळे कोविड काळात ऑक्सीजनचे महत्व समाजाला समजले आहे. यावेळी कोरोना बाधित रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन आपल्याला विकत घ्यावा लागत होता परंतु वृक्षाने आपल्याला मोफत ऑक्सिजन देण्याचे काम केले आम्ही सर्वजण वृक्ष व त्याचे संवर्धन ही संकल्पना राबवणार असल्याचे प्रतिपादन नगरसेवक रवींद्र लालबोंद्रे यांनी केले.
भिंगार येथे वीरशैव गवळी समाजाच्या स्मशानभूमीत वृक्षारोपण व सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ नगरसेवक रवींद्र लालबोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, पंचमंडळ आसाराम घुले, भीमलाल लालाबोंद्रे, नामदेव लंगोटे, विष्णू घुले, सदाशिव नागपूरे, मेजर शंकर बहिरट, विजय नामदे, महेश नामदे, शिवाजी दहीहंडे, भूषण लंगोटे, सुनील लालबोंद्रे,अनिल हरबा, संतोष नामदे, अशोक लंगोटे, चंदू औशीकार, मारुती निस्ताने, किरण नायकू, सुनील खताडे, भगवान हरबा, गणेश निस्ताने, दिनेश काटकर, भाऊ तोरडी, रमेश हरबा, राजू नामदे, राम बारसे, बाबू नायकू, आसाराम घुले आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शंकर बहिरट म्हणाले की, गवळी समाजाच्या स्मशानभूमीमध्ये विविध प्रश्न प्रलंबित आहेत.नगरसेवक रवींद्र लालबोंद्रे यांच्या प्रयत्नातून स्ट्रीट लाईट व सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. याच बरोबर गवळी समाजाला एकत्रित करून वृक्षारोपणाचा व संवर्धनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.त्यामुळे स्मशानभूमी मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लावली जाणार आहे.त्याचे संवर्धनही केले जाणार आहे असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment