ठुबेंकडून ओंकारला मोबाईल फोनची भेट... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 15, 2021

ठुबेंकडून ओंकारला मोबाईल फोनची भेट...

 ठुबेंकडून ओंकारला मोबाईल फोनची भेट...


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः
 कान्हुर पठार येथील संजय गुमटकर यांचा मुलगा ओंकार सध्या दहावी इयत्तेत आहे. मागील वर्षी संजयने मुलाच्या शिक्षणाविषयी चिंता व्यक्त केली होती.संजय हे अंध आहेत.पारनेर कारखान्यात ते टेलिफोन ऑपरेटर म्हणून सेवेत होते.टेलिफोन सेवा कालबाह्य झाल्याने आणि कारखाना बंद पडल्याने ती नोकरी गेली. मग खुर्च्या विणायचा ते व्यवसाय करायचे पण आता त्या खुर्च्याही कालबाह्य झाल्याने बेरोजगार होण्याची वेळ त्यांचेवर आली. कोरठण खंडोबा देवस्थानचे विश्वस्त आणि नुकतेच राज्य विद्युत मंडळ तालुका सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले चंद्रभान ठुबे यांचे कानावर हा विषय घातला असता त्यांनी लगेचच ओंकारच्या शैक्षणिक जबाबदारीचे पालकत्व स्विकारले.आता सर्व शिक्षण ऑनलाईन झाल्याने मोबाईल फोन गरजेचा असताना आज त्याला ह.भ.प. विलास महाराज लोंढे यांच्या हस्ते हा मोबाईल फोन ओंकारला देण्यात आला.चंद्रकांत ठुबे आपण कठीण परिस्थितीतुन जात असलेल्या या परिवारातील या मुलाचा शैक्षणिक खर्च उचलल्याने मोठा आधार मिळाला आहे.मोबाईल हातात पडल्यावर ओंकारच्या चेहर्‍यावरचा आनंद सर्वांना सुखावुन गेला.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here