अल्पवयीन बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 9, 2021

अल्पवयीन बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला.

 अल्पवयीन बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला.

आत्महत्या की घातपात; वांबोरी परिसरात चर्चेला उधाण...


राहुरी ः
दोन दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झालेल्या कुमारी किरण गणेश पाठक वय 13 या अल्पवयीन मुलीचा मृतदेह बांबोरी परिसरातील विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.मयत किरण पाठक हिचा मृतदेह विहिरीतून वर काढून उत्तरीय तपासणीसाठी वांबोरी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे.  एवढ्या लहान मुलीने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलणे ही बाब मनाला न पटणारी, अतिशय मन सुन्न करणारी असल्यामुळे हा घातपात की आत्महत्या याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे.
बुधवारी दि. 7 जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास आपल्या घरापासून बेपत्ता झालेली किरण गणेश पाठक (वय-13) ही बेपत्ता झाली होती. दरम्यान परिसरात सगळीकडे शोध घेऊन  तपास केला असता कुठे मिळून आली नाही. त्यानंतर रात्री आठच्या दरम्यान वांबोरी दूरक्षेत्र येथे बेपत्ता मुलीचे वडील गणेश (दत्ता) मनोज पाठक यांनी वांबोरी पोलीस  दूर क्षेत्रामध्ये मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ शोध घेण्यासाठी राहुरी चे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ यांच्यासह पोलीस हवालदार चंद्रकांत बर्हाटे, पोलीस हवालदार दिगंबर चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल रमेश शिंदे आदी घटनास्थळी भेट देऊन बेपत्ता किरणचा शोध सुरू केला  मात्र, काल सायंकाळी पाचच्या सुमारास वांबोरी-विळद रस्त्याच्या कडेला भारत जाधव यांच्या मालकीच्या गट नंबर विहिरीतील पाण्यात तरंगताना आढळून आले.

No comments:

Post a Comment