विनापरवाना डांबरी रस्ता खोदला; गुन्हा दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, July 9, 2021

विनापरवाना डांबरी रस्ता खोदला; गुन्हा दाखल

 विनापरवाना डांबरी रस्ता खोदला; गुन्हा दाखल

मनपा प्रशासनाकडून प्रथमच दखल...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर-पुणे रस्त्यावरील हॉटेल पंचवटीच्या मागे गणेशवाडीकडे जाणार्‍या रोडवरील हॉटेल रेडियस जवळील मनपा प्रशासनाच्या अंतर्गत येणारा डांबरी रस्ता खोदण्याप्रकरणी महापालिका अभियंता श्रीकांत निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून हॉटेल मालक राहुल रासकोंडा यांचेवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निंबाळकर यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 21 जून 2021 रोजी ठेकेदार चंद्रशेखर मस्के यांनी मला फोन करून कळवले की, प्रभाग क्रमांक 13 मधील नगर-पुणे रस्त्यावरील हॉटेल पंचवटीच्या मागील गणेशवाडीकडे जाणार्या रोडवर हॉटेल रेडियसजवळ असणारा डांबरी रोड खोदलेला आहे.त्यानुसार संबंधित रस्त्याची पाहणी केली असता तो खोदलेला आढळून आला. याबाबत हॉटेलचे मालक राहुल रासकोंडा यांना विचारणा केली. त्यावर त्यांनी टेलिफोन केबलच्या वायर दुरुस्तीसाठी आम्हीच रस्ता खोदला असल्याचे सांगितले.याप्रकरणी पंचनामा करून आयुक्तांसमोर अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर विनापरवाना रस्ता खोदल्याप्रकरणी संबंधित हॉटेल मालकांना नोटीस बजावण्यात आली. परंतु त्यांनी कोणताही दंड न भरल्याने त्यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले.त्यानुसार संबंधित हॉटेल मालकाच्या विरोधात फिर्याद देत असल्याचे निंबाळकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. निंबाळकर यांच्या फिर्यादीनुसार हॉटेल मालकांच्या विरोधात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here