आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 6, 2021

आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र.

 आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र.

पत्रकार दातीर हत्या प्रकरणातील...


राहुरी -
दक्ष पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कान्हु मोरे सह 4 आरोपींच्या विरोधात 942 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे.
कान्हु गंगाराम मोरे या मुख्य आरोपींसह लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी, तोफिक मुक्तार शेख, अक्षय सुरेश कुलथे, अनिल जनार्धन गावडे हे अन्य 4 आरोपी या प्रकरणात सामील असून हे प्रकरण राज्यभर गाजले आहे. पत्रकार रोहिदास दातीर हे दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते होते त्यांची हत्या झाल्यानंतर राज्यभर हे प्रकरण गाजले होते.आरोपीच्या  अटकेकरिता विविध सामाजिक संघटना आणि पत्रकार संघटना यांनी निवेदने दिली होती. राहुरी येथील  पत्रकार रोहिदास दातीर हे आपल्या घरी जात असताना मल्हारवाडी रोडने अचानक आलेल्या एका पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते. त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता  गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी वय 25 वर्ष राहणार जुने बस स्टँड जवळ एकलव्य वसाहत राहुरी व तोफिक मुक्तार शेख वय 21 वर्ष राहणार राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती गुन्ह्यातील मुख्य आरोपी सह अन्य एक जण फरार होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून  पोलीस अधीक्षक  मनोज पाटील  यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास ऊूीि संदीप मिटके  श्रीरामपुर यांचेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. मिटके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत यातील मुख्य. आरोपी कान्हु गंगाराम मोरे हा नेवासा फाटा येथे पैसे घेण्यासाठी येणार आहे, याबाबत गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाल्याने त्यास सापळा रचून शिताफीने अटक केली. व त्यास न्यायालयात हजर केले. न्यायालयात  जोरदार युक्तिवाद करून 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळवून  सदर गुन्ह्याचा  सखोल तपास केला. यातील दुसरा फरार आरोपी अक्षय कुलथे यास उत्तर प्रदेश मधील चटिया ता.  बीनंदनकी  जिल्हा  फत्तेपूर  उत्तर प्रदेश येथून शिताफीने अटक केली.सदर गुन्ह्याचा तपास  सुरू असताना व्यापारी अनिल गावडे  याने आरोपी कान्हु  मोरे  यास आर्थिक मदत केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. सदर प्रकरणात राजकीय दबाव असल्यामुळे व्यापारी अनिल गावडे यास आरोपी करणार नाहीत अशी राहुरी परिसरात दबक्या आवाजात चर्चा  होती. परंतु  सर्व राजकीय दबाव झुगारून व्यापारी गावडे यास आरोपी केले व भादवि कलम 212 प्रमाणे वाढवून न्यायालयात सविस्तर रिपोर्ट सादर करण्यात आला सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा श्रीरामपूर विभागाचे ऊू.ी.ि. संदीप मिटके यांनी मुदतीत तपास पूर्ण करून मुख्य आरोपी कान्हु मोरे याचे सह चार आरोपी विरोधात दोषारोप पत्र आज रोजी न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment