प्रशासक लवकरच गुन्हा दाखल करणार ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 6, 2021

प्रशासक लवकरच गुन्हा दाखल करणार !

 प्रशासक लवकरच गुन्हा दाखल करणार !

अर्बन शेवगाव शाखा बनावट सोने प्रकरण..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत बनावट सोन्या प्रकरणाचा मुद्दा गेल्या दोन वर्षांपासून गाजत आहे,  आज बँकेच्या आवारामध्ये त्याचा लिलाव सुरू झाला असताना पहिल्या पाच पिशव्यांमध्ये सोन्याच्या ऐवजी बेन्टेक्स दागिने आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली या प्रकरणासंदर्भात लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती नगर अर्बन शेड्युल बँकेचे प्रशासक महेंद्रकुमार रेखी यांनी दिली.
दरम्यान बँकेच्या अधिकार्‍यांनी लिलाव प्रक्रिया थांबल्यामुळे अनेक तर्क वितर्क सुरु झाले आहे. दरम्यान बनावट सोने असल्यामुळे 3 ते 4 कोटी रुपये आता वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची निर्माण झाले आहे. नगर अर्बन बँक अनेक वर्षापासून वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माजी खासदार दिलीप गांधी यांच्या अधिपत्याखाली या बँकेचा कारभार केला जात होता. या बँकेच्या अनेक तक्रारी या राज्य व केंद्र स्तरावर केलेल्या आहे. त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे सुद्धा त्यानंतर दाखल झालेले आहे. कोट्यवधी रुपयांचे बोगस कर्ज दिल्याप्रकरणी सुद्धा येथील कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर आर्थिक घोटाळे केल्याप्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्याचा तपास सध्या सुरू आहे. नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेमध्ये  शाखा अधिकारी गोरक्ष शिंदे यांनी 2018 साली बँकेच्या प्रशासनाला शेवगाव शाखेमध्ये साधारणतः 2018 पासून एकाच व्यक्ती च्या नावावर या सोने पिशव्या असाव्यात अशी शंका उपस्थित करून त्यांनी त्या वेळेला लेखी पत्र देऊन  बँकेच्या प्रशासनास दिले होते व या विषयी लक्ष वेधले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत नव्हती त्या वेळेला नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी व पोपट लोढा यांनी बँकेला लेखी पत्र लिहून या सर्व प्रकरणाची  चौकशी करा अशी मागणी त्यांनी 2019 आली केली होती. समितीच्या वतीने या प्रकरणासंदर्भात निवेदने देण्यात आले होते, मात्र बँकेवर प्रशासक नियुक्त केल्यामुळे या प्रकरणांमध्ये लक्ष घालण्यास तयार नव्हते.त्या नंतर आंदोलनाचे हत्यार उपसले नंतर बँकेच्या वतीने या सोनेतारणचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला व रितसर जाहिरात देऊन लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.आज बँकेच्या आवरा त त्या पिशव्या फोडण्यात येत असताना पहिल्या पाच पिशव्या मध्ये सोन्या एवजी बेनटेक्स दागिने असल्याचे दिसून आले.व एकच खळबळ उडाली होती.
वास्तविक पाहता नगर अर्बन बँकेच्या सोने तारणचा विषय गेल्या दोन वर्षापासून चा गाजत आहे आज लिलावाच्या दरम्यान बेन्टेक्स चे दागिने सापडल्यामुळे प्रशासनाने तात्काळ लिलाव न करण्याचा निर्णय घेऊन ही प्रक्रिया  येथे थांबली विशेष म्हणजे या ठिकाणी आलेले सर्व सोन्याचे व्यापारी या ठिकाणाहून निघून गेले होते तर सुमारे आठ दिवस लिलावाची प्रक्रिया सुरू होती यामध्ये दोन 364 पिशव्यांमध्ये बनावट सोने आढळून आले आहे. या संदर्भामध्ये बँकेचे प्रशासक महेंद्र कुमार रेखी, यांनी या शाखेमध्ये 364 पिशव्यांमध्ये सोने आढळून आलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. फक्त 27 लाख रुपयांचे सोने आम्हाला मिळू शकलेले आहे. उर्वरित रक्कमची   फसवणूक झाली आहे हे उघड झाले असून येत्या दोन दिवसांमध्ये या संदर्भामध्ये पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यासंदर्भात  प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान गेल्या दोन वर्षापासून सोने तारण याचा विषय सुरू आहे,  बनावट सोन्यामुळे बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्या वेळेला कोण व्हॅल्यूअर होता कोणाच्या सांगण्यावरून हे कर्ज देण्यात आले तसेच त्या वेळेला कोणकोण अधिकारी त्या ठिकाणी होते याचा सर्व तपास आता करावा लागणार आहे.

No comments:

Post a Comment