काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार - बाळासाहेब थोरात. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, July 19, 2021

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार - बाळासाहेब थोरात.

 काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार - बाळासाहेब थोरात.

शिर्डी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विखेंच्या बालेकिल्ल्यात मोर्चेबांधणी.


शिर्डी -
शिर्डी विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाची  पुन्हा एकदा नव्या जोमाने मोर्चेबांधणी सुरु असून पुष्पक रिसोर्ट येथे आयोजित कार्यक्रमात कॉ्ग्रेस पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्राचे वाटप करताना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आगामी काळात शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
शिर्डीत काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात  यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. याप्रसंगी आ. डॉ. सुधीर तांबे, डॉ. एकनाथ गोंदकर, काँग्रेस कमिटीचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, लताताई डांगे, श्रीकांत मापारी, विक्रांत दंडवते, स्वराज त्रिभुवन, अमृत गायके, सुरेश आरणे, अ‍ॅड. अविनाश शेजवळ, मदन मोकाटे, समीर शेख आदी पदाधिकार्यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here