निघोज परिसरात कंटेन्मेंट झोन घोषित ः तहसिलदार ज्योती देवरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 9, 2021

निघोज परिसरात कंटेन्मेंट झोन घोषित ः तहसिलदार ज्योती देवरे

 निघोज परिसरात कंटेन्मेंट झोन घोषित ः तहसिलदार ज्योती देवरे

निघोज व परिसरात कडक निर्बंध.

नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः निघोज आणी परिसरात कोरोना रुण्गांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने दि.22 जुलै पर्यंत तहसिलदार ज्योती देवरे यांनी कंटेन्मेंट झोन घोषित केला आहे.
सरपंच चित्राताई वराळ पाटील, पंचायत समिती, महसूल, आरोग्य, पोलिस या खात्यातील बहुसंख्य अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ या बैठकीस उपस्थित होते.
गेली पंधरा दिवसांपासून निघोज आणी परिसरातील कोरोना रुण्गांची संख्या वाढत आहे.कितीही निर्बंध असली तरी निघोज ग्रामस्थ ऐकत नाही.तालुक्यातील सर्व गावे एकीकडे व निघोज गाव दूसरीकडे असा विषय झाला असून ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य यांची जबाबदारी मोठी असून सौजन्याची ऐशीतैशी चालून देणार नाही.असा ईशारा तहसिलदार देवरे यांनी दिला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरी भागातील लोक आपल्याकडे येणार नाहीत.याची दक्षता आपण घेतली.आत्ता मात्र निघोजचे लोक नगर पुणे मुंबई येथे गेल्यावर त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते.असा प्रकार होत असल्याने निघोज व परिसरातील लोकांनी सावध राहाण्याची गरज आहे. यासाठी दि.22 पर्यंत आपण व अधिकारी निघोज येथे थांबणार असून जो पर्यंत करोना हद्दपार होत नाही.तो पर्यंत निघोज व परिसरातील कडक निर्बंध सुरुच राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.गाव व परिसरात दशक्रिया विधी, लग्न, पूजा, व ईतर कार्यक्रम यासाठी मोठी गर्दी होत असते.शेतमजूरांना व महिला मजूरांना छोट्याशा वाहनांमधून नेण्याआणण्याचे काम होत असते.तसेच कंपनीत जाणारे कर्मचारी,वाहक,चालक हे शहरात मोठ्या संख्येने जातात व येतात त्यांची राहाण्याची व्यवस्था स्वतंत्र करण्याची गरज आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेत निघोज ग्रामस्थांनी चांगले काम केले.बाहेरील मजूरांची राहाण्याची चांगली व्यवस्था केली.आत्ता मात्र आपल्याला काहीच होणार नाही.या आविर्भावात निघोज व परिसरातील जनतेने राहू नये.प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना सहकार्य करण्याची भूमिका घेत ग्रामस्थांनी दक्षता घेण्याचे आवाहन तहसिलदार देवरे यांनी केले आहे.

अत्यावश्यक सेवांना ठरावीक वेळेत परवानगी दिली असली तरी अर्धे शटर सुरू ठेउन व गर्दी न करता हे दूकाने सुरु राहतील याची दक्षता घेण्याचा विषय या बैठकीत घेण्यात आला.तसेच शाळेचे शिक्षक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य यांचे एकत्रित नियोजन करुन विविध प्रभागांमध्ये रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय व त्याची अंमलबजावणी करण्यात आली.

No comments:

Post a Comment