79.50 लक्ष रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 13, 2021

79.50 लक्ष रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न..

 79.50 लक्ष रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न..

गोरेगाव येथे सभापती काशिनाथ दाते सर यांचे जोरदार स्वागत..


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः  पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे लेखाशिर्ष 3054 अंतर्गत,गोरेगाव पारनेर रस्ता ते ढवळदरा रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी 15 लक्ष रुपये,गोरेगाव ते पिराचा दरा या रस्त्यासाठी 15 लक्ष रुपये, गोरेश्वर देवस्थान ते गोरेगाव कान्हुर रस्ता(पालखी मार्ग) काँक्रेटीकरणासाठी 15 लक्ष रुपये,गोरेश्वर मंदिर परीसरासाठी हायमॅक्स 15 लक्ष रुपये,स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी 7.50 लक्ष रुपये,अनुसुचिजाती आणि नवबौद्ध घटक वस्ती विकास अंतर्गत रस्ता काँक्रेटीकरणासाठी 5 लक्ष रुपये,समाजमंदीर बांधणे 7 लक्ष रुपये,अशा एकुण 79.50 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचाभूमीपुजन व लोकार्पण सोहळा अहमदनगर जिल्हा परीषदेचे बांधकाम व कृषि समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांचे शुभहस्ते व पारनेर पंचायत समिती चे सभापती गणेश शेळके यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
मनोगत व्यक्त करताना काशिनाथ दाते यांनी पारनेर तालुक्याला प्रथमच बांधकाम समिती मिळाली त्यामुळे जिल्ह्याचा समतोल राखताना पारनेर साठी झुकत माप देऊन तालुक्यातील वाड्या वस्त्या रस्त्यांच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणणार असल्याचा संकल्प बोलून दाखवला. बाबासाहेब तांबे हे निधी आणण्यात माहिर आहेत कुठून काय आणायचं,कधी काय मागायचं हे त्यांना अवगत आहे,सर्व योजनांचा परिपूर्ण अभ्यास असल्यामुळेच गोरेगाव जिल्ह्याच्या नकाशावर झळकत आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले,जल व्यवस्थापन समितीचे सदस्य राहुलपाटील शिंदे,शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले,पंचायत समिती सदस्य डॉ.श्रीकांत पठारे,मा. सदस्य शंकर नगरे,पारनेर शिवसेना शहरप्रमुख निलेश खोडदे,ढवळपुरीचे सरपंच डॉ.राजेश भनगडे,उद्योजक पोपटराव चौधरी,पाडळीचे सरपंच हरिश काका दावभट या सर्व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.मा.सभापती बाबसाहेब तांबे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी एसटी महामंडळामधुन निवृत्त झाल्याबद्दल बाळासाहेब पातारे यांचा गावच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.पारनेर तालुका विद्युत सल्लागार समिती सदस्यपदी रामदास भोसले तर आत्मा कमिटीच्या सदस्यपदी सरपंच सुमन बाबासाहेब तांबे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मा.सरपंच राजाराम नरसाळे,गोरेगावच्या सरपंच सुमन तांबे,उपसरपंच पै.दादाभाऊ नरसाळे,मिराताई नरसाळे, ग्रामपंचायत सदस्य अण्णा नरसाळे,समिंद्राबाई नरसाळे,स्मिता काकडे,अनुसया नरसाळे,शोभा तांबे,वामन चौरे,संध्या पातारे,मयूर पातारे,बंडु तांबे,विठ्ठल नांगरे,संतोष चौरे, शिवाजी काकडे,विठ्ठल दादा नरसाळे,अशोक तांबे, भाऊसाहेब तांबे,विकास काकडे,अशोक नरसाळे,रामदास नरसाळे,सोपान नांगरे,सुरेश चौरे,ऋषीकेश नरसाळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिशा फाऊंडेशन चे अध्यक्ष संदिप तांबे यांनी तर आभार सरपंच सुमन तांबे यांनी मानले.

No comments:

Post a Comment