कोरोनाकाळात ‘लोकमत रक्ताचे नात’ सुरु केलेला उपक्रम देशासाठी दिशादर्शक ः मच्छिंद्र लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, July 13, 2021

कोरोनाकाळात ‘लोकमत रक्ताचे नात’ सुरु केलेला उपक्रम देशासाठी दिशादर्शक ः मच्छिंद्र लंके

 कोरोनाकाळात ‘लोकमत रक्ताचे नात’ सुरु केलेला उपक्रम देशासाठी दिशादर्शक ः  मच्छिंद्र लंके

कन्हैय्या उद्योगसमुहाच्या शिबिरात 199 रक्तदात्यांचे रक्तदान!


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः निघोज येथे लोकमतचे संपादक स्वांतञ्यसेनानी स्व.जवाहारलाल ऊर्फ बाबुजी दर्डा यांच्या पुण्यतिथीनिम्मत   लोकमत रक्ताच नात  या मोहिमे अंतर्गत लोकमत व कन्हैय्या उदयोग समुह यांच्या संयुक्त विदयमाने रक्तदान शिबिर आयोजित केले  होते. यावेळी कन्हैय्या डेअरी फार्मचे चेअरमन  मच्छिंद्र लंके बोलत होते.
कन्हैय्या उदयोग समुहाने सामाजिक बांधिलकी जपत 199  रक्तदात्यांचे रक्तदान घडवुन आणले.आतापर्यंतच्या मोहिमेतील सर्वात जास्त रक्तदानाचा कन्हैय्या उदयोग समुहाचा पारनेर तालुक्यात विक्रम केला. रक्तदात्यांना  लोकमत व कन्हैय्या उदयोग समुहाकडुन विशेष सन्मान पञ व मळगंगा देवीची प्रतिमा भेट देण्यात आली.अध्यक्षस्थानी  कन्हैय्या उदयोग समुहाचे संस्थापक शांताराम लंके हे होते. चेअरमन मच्छिंद्र लंके म्हणाले यामुळे लाखो रुग्णांना दिलासा मिळणार आहे.त्यामुळे कन्हैय्या उदयोग समुह  यामध्ये सहभागी होवुन समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडत आहे.
रक्तदान शिबीर उदघाटनप्रसंगी जी.एस.महानगर बँकेचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद,आत्मा कमिटीचे अध्यक्ष अड.राहुल झावरे,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष ठकाराम लंके ,दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लंके ,महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळाचे सदस्य सोमनाथ वरखडे ,निघोज संस्था परिवाराचे अध्यक्ष वसंतराव कवाद,राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेश सरडे,निलेश लंके प्रतिष्ठानचे मिडियाप्रमुख संदिप चौधरी, पञकार दत्ताजी उनवणे ,संजय बाराहाते ,उदयराव शेरकर,जवळ्याचे सरपंच अनिता आढाव,शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे,राजेंद्र तारडे,शिवाजीराव लंके ,विकास सावंत,नितीन अडसुळ ,सुभाष आढाव ,सचिन वराळ,शंकर लामखडे ,राजेंद्र लाळगे ,मंगेश वराळ,गणेश कवाद,दिगंबर लाळगे  ,विश्वास शेटे ,रोहिदास लामखडे ,ह.भ.प.श्रीहरी महाराज  पवार,अरुण लंके ,मंगेश लंके ,अशोक ढवळे,अक्षय कवाद आदी मान्यवरांच्या हस्ते रक्तदानाचे उदघाटन झाले व आपण कन्हैय्या उदयोग समुहाचा एक घटक या भावनेतुन रक्तदानही केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कन्हैय्या उद्योग समुहाचे सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी मोठे परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुञसंचालन शिवव्याख्याते प्रा.ज्ञानेश्वर कवाद तर सर्वांचे आभार उदयोजक सुरेश पठारे यांनी मानले.

कन्हैय्या उदयोग समुह दरवर्षी मोठा किर्तन सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करत असते.परंतु कोरोनामुळे दोन वर्षी हा खंड पडला आहे.कोरोना काळात कोणताही सामाजिक उपक्रम असु दया आम्ही हिराराने भाग घेवुन आमची समाजाप्रती बांधिलकी जपत आलोय.लोकमतचा लोकमत रक्ताच नात हा उपक्रम कोरोनाकाळात भारतासह जगालाही दिशादर्शक ठरणार आहे. कारण कोरोनाकाळात रक्तदातेही रक्तदान करण्यास घाबरत आहे. लोकमतच्या उपक्रमामुळे रक्तदात्यांमध्ये आत्मविश्वास येत आहे.यामुळे अनेकांचे प्राण वाचणार असल्याचे कन्हैय्या उदयोग समुहाचे चेअरमन मच्छिंद्र लंके म्हणाले.शेतकरी कुटुंबातील तरुणाने आपल्या अपार कष्टाच्या जोरावर पारनेर तालुक्याचे उदयोग क्षेत्रातील नाव कन्हैय्या उदयोग समुहाच्या माध्यमातुन देश विदेशात पोहचविल्याबद्दल लोकमतचे जनरल मनेजर नरेंद्र अंकुश ,शरद मेहरकर सह सर्वच मान्यवरांनी मच्छिंद्र लंके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here