पारनेर तालुका होणार इंधनात स्वंयंपुर्ण, तालुक्यातील शेतकरीच पिकवणार इंधन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 12, 2021

पारनेर तालुका होणार इंधनात स्वंयंपुर्ण, तालुक्यातील शेतकरीच पिकवणार इंधन

 पारनेर तालुका होणार इंधनात स्वंयंपुर्ण, तालुक्यातील शेतकरीच पिकवणार इंधन


निघोज-
चउङ कंपनी अंतर्गत मळगंगा क्लीनफ्युअ प्रा. लि. जैविक इंधन व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचा पायाभरणी सोहळा गुरुवार दिनांक 8 जुलै रोजी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. शेतकर्‍यांच्या जीवनात आर्थिक संपन्नता आणण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजाविणार्‍या या प्रकल्पाच्या पायाभरणी सोहळ्यास वरुणराजाने हजेरी लावून या प्रकल्पास आपले आशीर्वाद दिले.
देशातील सर्वात मोठ्या म्हणजे प्रतिदिन 100 मे टन क्षमतेचा हा प्रकल्प पारनेर तालुक्यातील निघोज पिंपरी जलसेन रोड पठारवाडी हद्दीत उभारण्यात येत आहे या प्रकल्पाचा पायाभरणी सोहळा गुरुवारी सायंकाळी तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री निलेशजी लंके साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला.  यावेळी चउङ कंपनीचे प्राईम बी.डी.ए मा.श्री रणजित दातिर सर, श्री जितेश  सरडे, श्री अमित ढोले - जुन्नर, श्री राजेंद्र हाडवळे - आळे,कंपनीचे अध्यक्ष श्री सुरेश ढवण, उपाध्यक्ष श्री रामदास लंके, संचालक श्री प्रकाश थोरवे, श्री रायचंद गुंड, श्री रामदास रसाळ, श्री अशोकराव मेसे,श्री सोमनाथ वरखडे, श्री दिलीप ढवण, संदिप ढवळे, श्री एकनाथ लामखडे, श्री सौ.रंजना ढवण, श्री सौ शोभा टिकेकर, आर्किटेक् श्री मयुर डोंगरे, इंजिनियर श्री विनायक डेरे, श्री शिवाशेठ लंके, श्री पांडुरंग बेलोटे साहेब, श्री भाऊसाहेब पानमंद, श्री कचरशेठ कारखिले, श्री भाऊसाहेब कवडे,श्री सखाराम गोरडे चेअरमन, श्री भगवान डेरे, श्री संतोष ढवण, श्री लहू ढवण, श्री रमेश ढवण, श्री सुरेश रसाळ, श्री विलास कोल्हे, श्री संदेश थोरात,श्री  शरद लंके,श्री निखिल ढवण, श्री निलेश ढवण, श्री पाराजी लामखडे  तसेच सर्व चतझ ओनर्स व सभासद* या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी  चउङ कंपनीचे प्राईम बी.डी.ए मा.श्री रणजित दातिर सर, बोलताना या प्रकल्पाच्या उभारणी मागची संकल्पना स्पष्ट केली. निघोज-पिंपरी जलसेन रोड पठारवाडी हद्दीत या ठिकाणी हा प्रतिदिन 100 मेट्रीक टन इळे-उछॠ (जैव इंधन) व सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे दिवंगत राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सर  यांच्या स्वप्नातील भारत घडविण्याच्या दिशेने आपल्या कंपनीचे हे पहिले पाऊल आहे. समाजातील गरिबातील गरीब व्यक्तीचा विकास झाला पाहिजे असे डॉ. कलाम यांचे म्हणणे होते या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांच्या  स्वप्नांची पूर्तता होणार आहे. चउङ चे संस्थापक डॉ. श्याम घोलप यांच्या प्रेरणेने हा प्रकल्प कार्यान्वित होत असुन या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना ही उद्योगाचा दर्जा मिळणार असल्याची भावना श्री रणजित दातीर यांनी व्यक्त केली. विविध मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले शेतकर्‍यांच्या जीवनात खर्या अर्थाने आर्थिक स्थैर्य  आणणार्‍या या प्रकल्पाचा पायाभरणी सोहळा पार पडला असून येत्या काळात लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.यावेळी लोकप्रिय आमदार निलेशजी लंके यांनीही या प्रकल्पाचे शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक श्री सोमनाथ वरखडे यांनी केले व आभार प्रदर्शन कंपनीचे सचिव श्री दिलीपशेठ ढवण  यांनी केले.

No comments:

Post a Comment