वंचीत घटकांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देणे हेच प्रहार जनशक्ती पक्षाचे उद्दिष्ट ः पवार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 8, 2021

वंचीत घटकांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देणे हेच प्रहार जनशक्ती पक्षाचे उद्दिष्ट ः पवार

 वंचीत घटकांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देणे हेच प्रहार जनशक्ती पक्षाचे उद्दिष्ट ः पवार

खामगाव नंबर एक येथे प्रहार जनशक्ती पक्षाची शाखा, शालेय विद्यार्थ्यांना केले वहया पुस्तकाचे वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः राज्यमंत्री नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाची नेवासा तालुक्यातील खामगाव नंबर एक येथे वृक्षारोपण करून व शालेय विद्यार्थ्यांना वहया पुस्तके व खाऊचे वाटप करून प्रहारचे राज्य उपाध्यक्ष संतोष पवार व जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांच्या हस्ते प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेची स्थापना फलकाचे
अनावरण करून करण्यात आली.वंचीत घटकांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देणे हेच प्रहार जनशक्ती पक्षाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन राज्य उपाध्यक्ष संतोष पवार यांनी यावेळी बोलताना केले.,
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सल्लागार मेजर महादेव आव्हाड, प्रहार किसान आर्मी प्रमुख रघुनाथ आरगडे, प्रहार धरणग्रस्त कृती समिती अध्यक्ष कृष्णा सातपुते, जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर सांगळे, प्रहार सोशल मीडिया प्रमुख संजय वाघ, जिल्हा सल्लागार अँड.पांडुरंग औताडे, नेवासा तालुका वरिष्ठ कार्याध्यक्ष अनिल विधाटे, प्रहार पदाधिकारी राहुल मस्के, नेवासा युवक ता संघटक अक्षय जगताप तसेच मेजर संतोष घुले, विष्णू घुले, मेजर घाणमोडे, मेजर अंजन चव्हाण हे उपस्थित होते.
शाखेच्या उदघाटन प्रसंगी फलकाची फीत गावातील जेष्ठ नागरिक भगवान आगळे पाटील यांच्या हस्ते कापण्यात आली.खामगाव येथे दिव्यांग व लहान मुलांना विद्यार्थ्यांना उपस्थित सर्व नागरिकांना राज्य उपाध्यक्ष संतोष पवार, अभिजीत पोटे यांच्या हस्ते मिठाई खाऊ वाटप करण्यात आले
यावेळी बोलताना राज्य उपाध्यक्ष संतोष पवार म्हणाले की प्रहारचे राज्य उपाध्यक्ष संतोष पवार यांनी प्रहार जनशक्ती पक्षाची शाखा ही फक्त केवळ एक राजकीय पाटी नसून परिसरातील शेतकरी, कष्टकरी मजूर,निराधार, अनाथ, अपंग आणि सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आहे शाखेच्या माध्यमातून परिसरामध्ये विकास करता येईल तसेच आम्हाला राजकीय अस्तित्व निर्माण करायचे आहे परंतु आधी सामाजिक विचार रुजवून ते काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले
प्रहारचे  जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे म्हणाले की परिसरातील नागरिकांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व तरुणांनी प्रहार जनशक्ती पक्षांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले गावातील नागरिकांनी भारत माता की जय, जय जवान जय किसान, अपना भिडू बच्चू भाऊ कडू अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला या कार्यक्रमात गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment