शरणपूर वृद्धाश्रमातील वृद्धांना उबदार कपड्यांचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 8, 2021

शरणपूर वृद्धाश्रमातील वृद्धांना उबदार कपड्यांचे वाटप

 शरणपूर वृद्धाश्रमातील वृद्धांना उबदार कपड्यांचे वाटप

पित्याच्या स्मृती प्रित्यर्थ मुनोत परीवाराचा उपक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः आपल्या पित्याच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून मुलांनी नेवासाफाटा येथे सुरू असलेल्या शरणपूर वृद्धाश्रमातील वृद्धांना उबदार कपड्यांचे वाटप करून खर्‍या अर्थाने पित्याला श्रद्धांजली अर्पित केली.नेवासा येथील संजय ड्रेसेसचे प्रमुख स्वर्गीय संजय मुनोत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा उपक्रम राबविण्यात आला.
वृद्धाश्रमाच्या प्रांगणात छोटेखानी पध्दतीने झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवासाफाटा श्वास मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख हदयरोग तज्ञ डॉ. अविनाश काळे हे होते तर डॉ.शिवराज दारुंटे,विलासराव लंघे,सौ.प्रियंकाताई काळे,डॉ.प्रमोद देवखिळे,आम्ही नेवासकर ग्रुपचे प्रमुख पत्रकार अभिषेक गाडेकर, कार्यक्रम संयोजक सौरभ मुनोत,सोहम मुनोत,विकास खराडकर, रोहित पोतदार,शांतवन खंडागळे,अक्षय देवखिळे,कु.प्रज्ञा देवखिळे यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे वृद्धाश्रम चालक रावसाहेब मगर यांनी स्वागत केले.वृद्धाश्रमच्या नियोजित खडकाफाटा परिसरातील जागेसाठी मदतीचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.यावेळी वृद्धाश्रम कमिटीचे अध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण यांनी प्रास्ताविक केले करून वृद्धाश्रमाची चाललेल्या वाटचालीबद्दल माहिती दिली.यावेळी डॉ.अविनाश काळे यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या कार्याचा गौरव  सत्काराच्याद्वारे करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून वृद्धाश्रमाच्या नियोजित जागेसाठी व बांधकामासाठी आर्थिक योगदान देण्याचे आश्वासन दिले.यावेळी उपस्थित वृद्धांना उबदार कपड्यांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.वृद्धाश्रम चालक रावसाहेब मगर यांनी आभार मानले.हदयरोग तज्ञ डॉ.अविनाश काळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित वृद्धांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.

No comments:

Post a Comment