पेव्हर ब्लॉकचे काम औदुंबर चौकातील वैभवात भर घालणारे ठरेल-बालेंद्र पोतदार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 8, 2021

पेव्हर ब्लॉकचे काम औदुंबर चौकातील वैभवात भर घालणारे ठरेल-बालेंद्र पोतदार

 पेव्हर ब्लॉकचे काम औदुंबर चौकातील वैभवात भर घालणारे ठरेल-बालेंद्र पोतदा

नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील नगरसेवक संदीप बेहळे यांनी नामदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली  केलेल्या पाठपुराव्यामुळे औदुंबर चौकात विविध कार्यक्रमासाठी उपलब्ध असलेल्या जागेवर सुमारे सहा लाख रुपये खर्चाच्या पेव्हर ब्लॉक कामाचा शुभारंभ उपस्थित नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.पेव्हर ब्लॉकचे काम औदुंबर चौकातील वैभवात भर घालणारे ठरेल असा विश्वास शिवसेना प्रणित शिवसहकार सभेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना प्रणित शिव सहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार, नगराध्यक्ष सतीश पिंपळे, नगरपंचायत बांधकाम विभागाचे अभियंता प्रविण कदम,पत्रकार सुधीर चव्हाण, नगरसेवक संदीप बेहळे,काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन दादा जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून परिसरातील रहिवासी डॉ.अनिरुद्ध नवले,गणेश सोनवणे,फकिरा सोनवणे,बंटी जाधव, सुदर्शन पठाडे,प्रताप कडपे,सुमित पठाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष सतीश पिंपळे म्हणाले की नेवासा शहराच्या विकासाच्या ब्लु प्रिंट नुसार दर्जेदार कामे करण्याचा आमचा सर्व नगरसेवकांचा प्रयत्न आहे त्यासाठी नागरिकांनी देखील आम्हाला सूचनांद्वारे मार्गदर्शन करावे असे आवाहन केले.
यावेळी बोलताना बालेंद्र पोतदार म्हणाले की नेवासा शहरातील मुख्य व्यासपीठ म्हणून औदुंबर चौकाकडे पाहिले जाते,गजर गुढीचा हा नवोदित स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम येथे झाल्याने या चौकाला अधिक महत्व प्राप्त झाले विधानसभा निवडणुकीत देखील अनेक सभांची सांगता येथे करण्यात आल्या.यावेळी युवा नेते प्रशांतभाऊ गडाख यांनी या जागेवर पेव्हर ब्लॉक टाकून होणार्‍या कार्यक्रमासाठी हा परिसर सुशोभित केला जाईल असे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता झाल्याचे आम्हाला समाधान वाटते असे सांगून काम दर्जेदार व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

No comments:

Post a Comment