अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून “परिषद की पाठशाला” - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 8, 2021

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून “परिषद की पाठशाला”

 अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून “परिषद की पाठशाला”


नगरी दवंडी/प्रतिनिधी
शिर्डी ः कोरोना महामारीमुळे शाळा महाविद्यालये बंद आहेत. 100% समाज हा आर्थिक परिस्थिती आणि अपुरे नेटवर्क या कारणाने ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा उपयोग करण्यास असमर्थ आहे. यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाण्याची भीती निर्माण आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने संगमनेर तालुक्यात परिषद की पाठशाला हा नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत आहे.
या उपक्रमात 15 ते 20 ठिकाणी 50 हुन अधिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दररोज 400 हून अधिक शालेय विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ होत आहे. 1 ते 9 जुलै या कालावधीत तालुक्यात परिषद की पाठशाला हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच व्यावहारिक प्रशिक्षण, कौशल्य विकास, नवीन तंत्रज्ञान अशा अनेक विषयांचे धडे देण्यात येत आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न अभाविपच्या माध्यमातून केला जात आहे. या उपक्रमातून कार्यकत्यांनाही शिकायला मिळत आहे. या उपक्रमासाठी कार्यकर्ते संपर्कातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींशी संपर्क करतात व त्यांच्या व्याख्यानांचे आयोजन करतात. शालेय विद्यार्थ्यांची रुची वाढावी, यासाठी नावीन्यपूर्ण खेळ, गाणे यांचा देखील समावेश या उपक्रमात करण्यात आला आहे. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख अभाविप उत्तरनगरचे प्रा.अरुण लेले सर म्हणाले की, कोरोना महामारीच्या साथीमुळे मागील दीड ते दोन वर्षे विद्यार्थी काही प्रमाणात शिक्षणापासून वंचित झाले होते. काही प्रमाणात ऑनलाइन शिक्षण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले नाही. शाळेमध्ये जाऊन सहकारी मित्रांबरोबर शिकण्याच्या आनंदापासून विद्यार्थी दुरावले होते, त्यामुळे परिषदेच्या पाठशाळेमध्ये विद्यार्थी वर्गाला झालेला आनंद भरभरून वाहताना पाहून परिषदेच्या विद्यार्थी वर्गाचे हे पाऊल खूप आश्वासक आणि स्वागतार्ह आहे. परिषद की पाठशाला प्रमुख संगमनेर आदिती जाखदी म्हणाली की, परीक्षा की पाठशाला हा उपक्रम सध्या सर्वत्र चालवत आहे तसेच संगमनेर येथे रोज सुमारे 12 ते 13 ठिकाणी जाऊन हा उपक्रम घेण्यात येत आहे मुलेही यात अतिशय आनंदाने सहभाग दाखवत आहे तसेच वेगवेगळ्या मान्यवरांनी देखील येऊन मुलांनी गिफ्ट वही याचे नियोजन करून दिले तसेच मुलांची या पाठशाला बद्दलची रुची दिवसेंदिवस वाढत चालली आहे हे दिसून येते मुले आल्यावर सुरुवातीला प्रार्थना व मध्ये अभ्यासातले गमती गोष्टी असेही खेळ व पसायदानाने पाठशालाचा शेवट घेतो मुलेही याच स्वतःहून रोज गोष्टी गाणी पाठ करून येत आहेत त्यातून त्यांची पाठशाळेचे बद्दलची गोडी दिसून येते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here