आधारवडा चे आधार बनाल का? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 8, 2021

आधारवडा चे आधार बनाल का?

 आधारवडा चे आधार बनाल का?


कर्जत -
आई वडील हे मुलांना आपले आयुष्य खर्ची घालून वाढवतात त्याच्या शिक्षणा पासून त्यांना स्वता:च्या पायावर उभे करतात, लग्न करून देतात स्वतः कमावलेले किडुक मिडुक हवाली करतात व हीच मुले आपल्या जन्मदात्या आईबापाला त्याच्या अडचणीच्या काळात वार्‍यावर सोडतात या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने गांभिर्याने पाहण्याची गरज असून ज्या आई वडिलांना त्याची मुले सांभाळत नाहीत, बरे बघत नाहीत अशांना आरसा दाखविण्याची गरज आहे, अशा जेष्ठ नागरिकांसाठी अनेक कायदे असताना त्याची अंमलबजावणी करण्याची धमक संबंधित अधिकारी दाखवत नाहीत, सध्या कर्जत तालुक्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तरी या प्रश्नाकडे लक्ष देतील व या जेष्ठ नागरिकांना न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात अपार कष्ट करतो, आपल्या मुलांना सर्व काही उपलब्ध व्हावे म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करतो, वेळप्रसंगी स्वतःसाठी काही घेत नाही पण मुलांना काही कमी पडू देत नाही. आपल्याला जे मिळाले नाही ते आपल्या मुलांना तरी मिळालेच पाहिजे यासाठी जीवाचे रान करतो. आपल्या मुलांना काहीही कमी पडू देत नाही, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढतो, सावराकांराकडून पैसे घेतो,  मुलांना जे शिक्षण घ्यावे वाटेल ते घेण्यासाठी सर्व सुुखसोई सुविधा उपलब्ध करून देतो, आपलाा मुलगा वयात आला की नातेवाईकांना आपल्या मित्राना गळ घालून त्याला सुस्वरूप मुलगी पाहून त्याचा विवाह लावून देतो व आपली सर्व जमा पुंजी मुलाच्या व सुनेच्या ताब्यात देतो, सध्या भारतीय संस्कृती मध्ये याच पद्धतीने प्रत्येक जण कार्यरत असताना आजच्या घडीला अनेक जण लग्न होताच
बदलतात कसे असा गहन प्रश्न उभा राहिला आहे. सदरचे नव परिणीत जोडपे अक्षरशः आपल्या संसारात गुरफटतात,
 आपल्या मुलाबाळाचा विचार करायला लागतात व आपल्या आई वडिलांना मात्र विसरून जातात की काय असा मोठा प्रश्न सध्या समाजात उभा राहिला आहे. त्यामुळे अनेक जेष्ठ नागरिकांना आज अडचणींचा सामना करावा लागत आहे, अनेक कुटुंबातील जेष्ठ नागरिकांना त्याची मुले सुना नीट बोलत नाहीत, खायप्यायला देत नाहीत, अथवा घरातही थारा देत नाहीत, आपली मोठी कुचंबणा होत असताना लोक लज्जे पायी कोणाला सांगूही शकत नाहीत, अशा जेष्ठ नागरिकांसाठी अनेक कायदे आहेत नियम आहेत मात्र त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही. अशा बाबी कडे प्रशासनाने लोक प्रतिनिधींनी गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.
कर्जत तालुक्यात पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अनेक प्रश्नाकडे लक्ष देऊन ते तडीस नेण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू ठेवला आहे, तालुक्यात अवैध व्यवसाय बंद आहेत, मुलीच्या महिलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जात आहे, अवैध सावकारी व्यवसाया विरुद्ध फास आवळला आहे, अनेक गुन्ह्याचा तपास लागत आहे, रस्त्यावरील गाड्याच्या पार्किंगला एका दोरीत आणले आहे, त्यामुळे पो. नी. यादव यांच्या कडून नागरिकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत, त्यांनी आपल्या कार्यपद्धतीने जेष्ठ नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष दिल्यास नक्कीच तालुक्यातीलच नव्हे तर समाजातील हा अत्यंत दुर्लक्षित प्रश्न नक्कीच प्रकाशात येईल व या अडलेल्या नडलेल्या व आपल्याच पोटच्या पोराविरुद्ध अवाक्षर ही बोलू न शकणार्‍या नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.
समाजात सगळेच मुले असेच वागतात असे नाही काही मुले आपल्या आई वडिलांना अत्यंत योग्य आहे पद्धतीने आदर करत त्याच्या मार्गदर्शनाखाली आपले काम करतात अशा मुलांचा खरा आदर्श इतरांनी घेण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment