मनपाच्या 5 सफाई कामगारांना नियुक्ती आदेश प्रदान ः महापौर रोहिणी शेंडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 8, 2021

मनपाच्या 5 सफाई कामगारांना नियुक्ती आदेश प्रदान ः महापौर रोहिणी शेंडगे

 मनपाच्या 5 सफाई कामगारांना नियुक्ती आदेश प्रदान ः महापौर रोहिणी शेंडगे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचा-यांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार 5 सफाई कामगारांना नेमणुकीचे आदेश  महापौर रोहिणीताई शेंडगे व उपमहापौर गणेश भोसले यांचे शुभहस्ते देण्यात आले. यावेळी नगरसेवक सचिन शिंदे, गणेश कवडे, शाम नळकांडे, प्रशांत गायकवाड, संभाजी कदम, दत्ता जाधव, संतोष गेणप्पा, कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, आनंद वायकर, श्री.किशोर कानडे आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर रोहिणीताई शेंडगे म्हणाल्या की, लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारस नेमणुकीचे पत्र  मिळण्यासाठी कामगार वर्ग प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करित होते. त्या कर्मचार्‍यांना आज नियुक्तीचे पत्र देण्यात आले. कर्मचार्‍यांनी मनपाच्या नियमाप्रमाणे सेवेमध्ये प्रामाणिक काम करावे व मनपाचे हित जोपासावे तसेच नियमीत व वेळेत नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यात यावे.
यावेळी उपमहापौर मा.श्री.गणेश भोसले म्हणाले की, प्रत्येक कर्मचार्‍याने वेळेवर कामावर येवून प्रामाणिकपणे काम केले गेले पाहिजे. मनपाचा विस्तार मोठा असून नागरिकांच्या कामा विषयी सुध्दा अपेक्षा वाढलेल्या आहेत.  प्रत्येक कर्मचार्‍यांने नेमणुकीच्या ठिकाणी जबाबदारीने काम केले पाहिजे असे उपमहापौर गणेश भोसले म्हणाले. यावेळी अजय साठे, शैलेश बुलाखे, अतुल उमाप, अमर वैराळ, संघराज जगताप  या  कर्मचार्‍यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले.

No comments:

Post a Comment