जनसेवा मेडिकल फौंडेशनच्यावतीने नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, July 3, 2021

जनसेवा मेडिकल फौंडेशनच्यावतीने नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांचा सत्कार

 जनसेवा मेडिकल फौंडेशनच्यावतीने नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांचा सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  महापौर पद हे एक पालकत्व आहे. नागरिकांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना सुविधा पुरविण्यासाठी महापौर कार्यरत असतात. सौ.रोहिणी शेंडगे या पदाच्या माध्यमातून नागरिकांचा चांगल्या सेवा देऊन, त्यांचे प्रश्न सोडवितील. महिला महापौर असल्याने त्या माध्यमातून महिलांच्या समस्या त्यांनाही ज्ञात असल्याने त्या सोडवतीलच, त्याचबरोबर शहर विकासात योगदान देतील, असा विश्वास अब्दुस सलामसर यांनी व्यक्त केला.
मनपाच्या नूतन महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल जनसेवा मेडिकल अ‍ॅण्ड एज्युकेशन फौंडेशनचे प्रमुख कार्यवाह डॉ.प्रा.शेख अब्दुस सलाम सर व अरुणा आसिफअली शैक्षणिक व सामाजिक महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.फरीदाभाभी यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व साडी देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देतांना सौ.रोहिणी शेंडगे म्हणाल्या, सर्वांच्या सहकार्याने मिळालेल्या महापौर पदाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवून नगर शहराचा विकासास प्राधान्य देणार आहोत. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रासाठी मनपाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवू असे सांगून सत्काराबद्दल आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here