सावेडी आदर्श प्रभाग निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण करणार- पाउलबुधे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 3, 2021

सावेडी आदर्श प्रभाग निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण करणार- पाउलबुधे

 सावेडी आदर्श प्रभाग निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण करणार- पाउलबुधे

प्रभाग क्र.2 मधील गुलाबनगरला ड्रेनेज कामाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रभाग क्रमांक दोन व चार नगरसेवक, बे-दुणे चार प्रभागाच्या विकासासाठी आर-पार हे समीकरण सध्या आमच्या बाबतीत आहे. प्रभागाचा विस्तार मोठा असूनही चारही नगरसेवकांच्या एकीमुळे प्रत्येक भागात आवश्यकतेनुसार कामे सुरु आहेत. सावेडी उपनगरात आदर्श प्रभाग निर्माण करण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार, असे प्रतिपादन नगरसेवक विनित पाउलबुधे यांनी केले.
प्रभाग क्र.2 मधील गुलाबनगर येथे आरसीसी ड्रेनेज पाईप कामाचा शुभारंभ नगरसेवक पाउलबुधे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, वसंत कराळे, भास्कर खेडकर, सतीश कणगे, बाबासाहेब लांडगे, छोटू देसर्डा, सचिन लोटके, हर्षल विधाते, प्रसाद साळी आदिंसह नागरिक, महिला उपस्थित होत्या.
श्री.पाउलबुधे पुढे म्हणाले, प्रभागाच्या विकासासाठी आम्ही चारही नगरसेवक एकत्र असतो. प्रत्येक भागात रस्ते, पाणी, वीज प्रश्न ड्रेनेजलाईनची कामे सध्या सुरु आहेत. त्यामुळे विकासाची ही गंगा सर्वत्र दिसेल, आदर्शप्रभाग निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.
बाळासाहेब पवार म्हणाले की, आमच्या प्रभागात आम्ही नागरिकांना दिलेला शब्द पाळतो. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य देतो. या भागाचा ड्रेनेजचा प्रश्न सुटत असून, आम्ही प्रश्न सोडवण्यास कुठे कमी पडत नाही, याचे समाधान वाटते. निखिल वारे, सुनिल त्र्यंबके यांनी आपली मनोगत व्यक्त करतांना सांगितले की विकास कामांसाठी नागरिकांशी आम्ही एकनिष्ठ आहे. त्यांचे प्रश्न सोडविणे हे कर्तव्य समजतो.
नागरिकांच्यावतीने ज्येष्ठ नागरिक  बाबासाहेब लांडगे म्हणाले की, गुलाबनगरला रस्ते डांबरीकरण व ड्रेनेज लाईन कामामुळे ज्वलंत प्रश्न आमचा सुटला या चारही नगरसेवकांनी आश्वासने न देता प्रत्यक्षात कामे करुन आम्हाला खरा न्याय दिला. शहराचे आमदार संग्राम जगताप व या नगरसेवकांनी मोठा निधी प्रभागात आणला त्याचा विनियोग चांगला केला, त्यामुळे भविष्यात नागरिक देखील त्यांच्या मागे उभे राहतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला. शेवटी सचिन लोटके यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment