जिल्हाधिकारी साहेब छोट्या उद्योग धंद्यावर दया करा ः श्रीनिवास बोज्जा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, July 3, 2021

जिल्हाधिकारी साहेब छोट्या उद्योग धंद्यावर दया करा ः श्रीनिवास बोज्जा

 जिल्हाधिकारी साहेब छोट्या उद्योग धंद्यावर दया करा ः श्रीनिवास बोज्जा

छोट्या खाद्य व्यावसायिकांना पार्सल सुविधेची परवानगी मिळावी

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः साध्यच्या लोकडाऊन मुळे छोटया खाद्य व्यावसायिकांचे हाल होत असल्यामुळे या छोटया व्यावसायिकांना पार्सल सुविधेची परवानगी दयावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदनाद्वारे केले आहे.
कोरोना महामारी मुळे प्रशासनाने सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत लोकडाऊन केले व हॉटेल व्यावसायिकांना पार्सल सुविधेची परवानगी दिली परंतु जे खाद्य पदार्थ चे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा पार्सल सुविधे ची परवानगी देणे गरजेचे आहे. या छोटे व्यावसायिक मध्ये वडा पाव सेंटर, चायनीज सेंटर, पाव भाजी सेंटर, चाय सेंटर, ज्यूस सेंटर अशा व्यावसायिकांना पार्सल सुविधेची परवानगी दिल्यास त्यांचा उदरनिर्वाह साठी उत्पन्न मिळेल. सध्या या व्यावसायिकांना पार्सल सुविधेची परवानगी न दिल्यामुळं यांचे व त्यांचे कुटुंबाचे अत्यंत हाल होत आहेत या बबिकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
कोरोना ही न संपणारी प्रक्रिया आहे, आज निगेटीव्ह आलेला व्यक्ती उद्या पॉजिटीव्ह येऊ शकतो, मग आयुष्यभर लॉकडाऊन करणार का हाही प्रश्न उपस्थित झाला आहे. एक वर्षापासून सर्व छोटे व्यवसाय बंद आहेत त्यांनी जगायचे कसे त्यांच्या जगण्याची सोय अगोदर करा आणि नंतरच लॉक डाऊन करा. हातावर पोट असणार्‍या व्यक्तीला संध्याकाळच्या जेवणाची चिंता असते तो कसा जगणार ही गंभीर बाब निर्माण झाली आहे. छोटे व्यावसायिक करोना मुळे नाही तर उपासमारीने मरतील प्रशासनाने छोटया व्यवसायिकांच्या कडे लक्ष देऊन या व्यावसायिकांना पार्सल सुविधा साठी परवानगी दिल्यास हे व्यापारी जगू शकतील नाही तर हे व्यावसायिक करोना मुळे नाही तर उपासमारीने मरतील अशी गंभीर परिस्तिथी निर्माण झाली आहे.या बाबत मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी त्वरित आदेश काढून छोटया खाद्य व्यावसायिकांना पार्सल सुविधेची परवानगी द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी एका पत्रकान्वये केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here