भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी सोपान कदम यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 10, 2021

भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी सोपान कदम यांची निवड

 भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी सोपान कदम यांची निवड

मराठा समाजाचा वापर मतासाठी केला - राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.आप्पासाहेब आहेर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सर्वांनी एकत्र होणे गरजेचे आहे. राजकीय नेत्यांनी मतांसाठी मराठा समाजाचा वापर करू घेत आहे, समाजाच्या न्याय हक्कासाठी, समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणताही राजकीय नेता पुढे येत नाही यासाठी समाजाला एकत्रित करणे गरजेचे आहे. युवकांच्या माध्यमातून मराठा समाजाला एकत्रित केले जाईल, मराठा समाजातील गोर-गरीब शेतकर्‍यांनची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत, यासाठी शैक्षणिक आरक्षण मिळणे गरजेचे आहे.त्यासाठीच भारतीय मराठा महासंघ समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सार्वत्रिक निवडणुका लढविणार आहे.भारतीय मराठा महासंघाच्या नगर जिल्हाध्यक्ष पदी सोपान तात्या कदम यांची निवड केली आहे. ते या पदाच्या माध्यमातून समाजातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावतील असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.आप्पासाहेब आहेर यांनी केले.
भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्षपदि निवडीचे पत्र सोपान तात्या कदम यांना देताना राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.आप्पासाहेब आहेर, प्रदेशाध्यक्ष डॉ.बन्सी डोके, कार्याध्यक्ष रोहिनीताई राऊत, रंगनाथ लबडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना नूतन जिल्हाध्यक्ष सोपान तात्या कदम म्हणाले की, नगर जिल्ह्यातील युवकांचे संघटन करून भारतीय मराठा महासंघाचे विचार मराठा समाजामध्ये घेऊन जाणार आहे, अन्यायाच्या विरोधात वाचा फोडणार आहे, मराठा समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रश्न मार्गी लावणार तसेच मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात विचार-विनिमय करून लढा उभा करणार यासाठी जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर करत आहे यामध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी सुदाम मुखेकर, नगर शहराध्यक्षपदी विलास रोढे, नगर तालुका अध्यक्षपदी संतोष कंडेकर, पाथर्डी तालुका अध्यक्षपदी सुजित जगताप, शेवगाव तालुका अध्यक्षपदी दिगंबर डोके, नगर शहर महिला अध्यक्षपदी कमलताई जाधव, उपाध्यक्षपदी कल्पना गुंजाळ याची निवड करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment