बेघर करण्याचा प्रयत्न.. नागरिकांचा आत्मदहनाचा इशारा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 14, 2021

बेघर करण्याचा प्रयत्न.. नागरिकांचा आत्मदहनाचा इशारा.

 बेघर करण्याचा प्रयत्न.. नागरिकांचा आत्मदहनाचा इशारा.

स्वमालकीच्या जागा अतिक्रमणात दाखविण्याचा मनपा प्रशासनाचा अजब कारभार.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील आय.आय. लाईन बाजार, औरंगाबाद रोड परिसरातील नागरिकांची स्वमालकीची जमीन असून ते पन्नास वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यास असताना मनपा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी दर दोन दिवसाआड येऊन या नागरिकांना नोटिसा देऊन बेघर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा प्रकार थांबवा नाहीतर आम्ही आत्मदहन करू असा इशारा परिसरातील नागरिकांनी आयुक्तांना निवेदनात दिला आहे
या भागातील रहिवासी असलेले अजय रतनाकर मकासरे, युनुस चांद शेख, एस. बी.पटेल, नदीम जहागीरदार, वाहिद हुंडेकरी, फिरोज सय्यद, अजमत हाजी,नवेद सिमला, इमरान जहागीरदार, अहमद शेख व इतर नागरिकांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, आम्ही सर्व रहिवासी या परीसरामध्ये मागील 50 वर्षापासून वास्तव्यास आहोत. व सदरील मालमत्ता ही आमच्या स्व:ताच्या कायदेशीर मालकी हक्काची आहे. सदरील ठिकाणी मोठया प्रमाणामध्ये लोक वास्तव्य आहे. मागील काही दिवसापासुन महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी हे दर दोन दिवस आड विना परवानगी विना नोटीस आमच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये येत आहेत व मोज माप करुन वेगवेगळ्या ठिकाणी खुणा लावून जात आहेत व सदरील आमच्या स्व: अर्जित मालकी हक्काची जागा अतिक्रमणाच्या नावा खाली जमीन दोस्त करण्याच्या धमक्या देऊन जात आहे.
आम्ही सर्व रहिवासी लोकांनी कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. तसे अतिक्रमण आढळल्यास सदरील अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही सर्व रहिवासी प्रशासनास सहकार्य करु. एकीकडे प्रशासनाचे धोरण म्हणजे सर्वाना राहण्यासाठी घर मिळावे असे आहे. तर दुसरी कडे नगर महापालिकेचे अधिकारी आमच्या सारख्या सामान्य गरिब कुटुंबाना बेघर करण्याच्या बेतात आहे. सदरील अधिकारी आम्हाला बेघर करण्याच्या धमक्या देत आहेत.
मागील 2 वर्षांपासून कोविड 19 च्या माहामारी मुळे आमच्या सारख्या गरीब दुर्बल लोकांच्या हाताला काम राहिलेले नाही. अशा परिस्थीतीमुळे आमच्या वर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी आम्हाला बेघर करु इच्छीत आहेत. जर अशी परिस्थिती उदभवली तर आम्हा सर्व रहिवासी यांना प्रशासना समोर सामुहिक आत्मदहन करण्या शिवाय पर्याय राहणार नाही तरी ही प्रशासनाने याची नोंद घ्यावी व त्वरीत महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांना समज दयावी जेणे करुन आम्ही सर्व रहिवासी स्व:अर्जित स्व:ताच्या मालकीच्या रहिवासी जागेमध्ये राहण्याचा अधिकार हिरावून घेऊ नये अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment