24 जुलैपर्यंत आरोपी अर्जुन वायभासेला पोलिस कस्टडी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 22, 2021

24 जुलैपर्यंत आरोपी अर्जुन वायभासेला पोलिस कस्टडी.

 24 जुलैपर्यंत आरोपी अर्जुन वायभासेला पोलिस कस्टडी.

हनी ट्रॅपमध्ये महिलेने बनावट पती दाखविला...

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पाथर्डीतील बागायतदाराला हनीट्रॅप द्वारे ब्लॅकमेलिंग करून 2 लाखांची खंडणी मागणार्‍या महिलेने बागायतदारासमोर जो“पती” उभा केला तो नकली असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नकली पती अर्जुन नारायण वायभासे (रा.चेतना कॉलनी नवनागापूर) यास न्यायालयात हजर करता न्यायालयाने 24 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अहमदनगरच्या वडगाव गुप्ता परिसरात राहणार्‍या तरुणीने पाथर्डी तालुक्यातील बागायतदाराशी मैत्री केली. त्या बागायतदाराला वडगाव गुप्ता येथील घरी बोलून घेतले. तेथे त्याच्यासोबत फोटो काढले. या फोटोच्या आधारे तरुणीने त्या बागायतदाराला ‘ब्लॅकमेल’ करण्याचे ठरविले. दि. 15 जून रोजी सायंकाळी ते दोघे एकत्र असताना त्याठिकाणी अर्जुन वायभासे आला. त्याने त्यांना एकत्र पाहिले. मी या महिलेचा पती आहे, असे वायभासे याने बागायतदाराला भासविले आणि त्याला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन बागायतदाराकडील पाच हजार रुपयांची रक्कम काढून घेतली होती. त्यानंतर पंटर गणेश गिर्हे याच्या मध्यस्थीने बागयतदाराकडून दोन लाख रुपयाचे तीन चेक घेतले होते. या हनीट्रॅप टोळीने आणखी कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधावा आणि फिर्याद द्यावी, असे आवाहन निरीक्षक आठरे यांनी केले आहे.
‘हनीट्रॅप’द्वारे केली गेलेली फसवणूक ही काही एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीने घातलेला आर्थिक गंडा नाही. ‘आंबटशौकिन’ लोकांनी एक चंगळ म्हणून केलेला एक वेगळा प्रयत्न आहे. त्यामुळे या वेगळ्या प्रयत्नात संबंधितांच्या ‘अब्रूचं खोबरं’ होणार, अशी या ‘हनीट्रॅप’मध्ये फसलेल्यांना भिती आहे.अशा परिस्थितीमुळे या ‘हनीट्रॅप’विरोधात बदनामीच्या भितीमुळे सामान्य माणूस तक्रार करील का, या प्रश्नाचं उत्तर मात्र आजमितीला कोणाकडेच नाही.

No comments:

Post a Comment