स्कार्पिओ, पिकअप मधून गोमांसाची वाहतूक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 22, 2021

स्कार्पिओ, पिकअप मधून गोमांसाची वाहतूक.

 स्कार्पिओ, पिकअप मधून गोमांसाची वाहतूक.

4 जन गजाआड; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्कॉर्पिओ व पिकअपमधून गोमांसाची वाहतूक करणार्‍या ताहेर साजीद शेख (वय 27 रा. कोठला), अब्दूल सत्तार इसनभाई तांबोळी (वय 42), नदीम नादीर शहा (वय 25), मोहमंद अल्ताफ कुरेशी (वय 30 सर्व रा. शिरूर जि. पुणे) अशा 4 जणांवर एलसीबी व भिंगार पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन्ही वाहनासह एक हजार 700 किलो गोमांस असा 11 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या पथकाने नगर-जामखेड रोडवरील कँन्टोमेंट टोल नाक्याजवळ ही कारवाई केली.
दोन वाहनामध्ये गोमांसची वाहतूक केली जात असून नगर-जामखेड रोडवर सापळा लावल्यास ते मिळून येतील, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. निरीक्षक कटके यांनी उपनिरीक्षक गणेश इंगळे, पोलीस कर्मचारी संदीप घोडके, दिनेश मोरे, संदीप पवार, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे व भिंगार पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस कर्मचारी मगर, द्वारके व खेडकर यांच्या पथकाने जामखेड रोडवरील कॅन्टोमेंट नाक्याजवळ सापळा लावला. माहिती मिळालेली वाहने येताच पोलिसांनी त्यांना अडविले. पंचासमक्ष वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये गोमांस आढळून आले. पोलिसांनी चौघांना अटक करत गोमांस व वाहने जप्त केली आहे.

No comments:

Post a Comment