साखरेची परस्पर विल्हेवाट 9 लाखांची फसवणूक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 22, 2021

साखरेची परस्पर विल्हेवाट 9 लाखांची फसवणूक.

 साखरेची परस्पर विल्हेवाट 9 लाखांची फसवणूक.

भेंडा : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना येथून उचललेल्या 270 क्विंटल साखरेची परस्पर विल्हेवाट लावून 9 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज मानधुने (रा. एरंडोल जि. जळगाव) व दोन ट्रक चालकांच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.मंजूश्री महेश करवा (रा. फलटण, जि. सातारा) यांची गणपती एन्टरप्रायजेस नावाची फर्म आहे. त्यांनी फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. करवा या त्यांच्या पती समवेत साखर कारखान्यांकडून साखर विकत घेऊन मागणीनुसार व्यापार्‍यांना साखर पुरवठा करतात. एप्रिल 2020 मध्ये या व्यवसायातून मनोज मानुधने यांच्याशी ओळख झाली. त्यांच्यामार्फत प्रकाशचंद ओसवाल (रा. जामनेर, जि. जळगाव) यांना वेळोवळी साखर पाठविली. यामुळे मनोज मानुधने यांनी विश्वास संपादन केल्याने ज्ञानेश्वर कारखाना येथून 10 जून रोजी (ट्रक क्र. एमएच 19 जे 3986) मधून 120 क्विंटल व 12 जून रोजी (ट्रक क्र. एमएच 20 ए 1952) मधून 150 क्विंटल साखर मानुधनेमार्फत प्रकाशचंद ओसवाल जामनेर यांना दोन ट्रकमधून पाठविली. साखरेचे पैसे नेहमी 10 दिवसात जमा होतात. पैसे जमा न झाल्याने ओसवाल यांना फोन केला. त्यावेळी त्यांनी सांगितले की आपल्याकडील कोणत्याही साखरेच्या ट्रक माझ्याकडे खाली झालेल्या नाहीत. ओसवाल यांनी मानुधने यांनाही फोनवर घेतले. त्यावेळी मानुधने यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचवेळी आपली फसवणूक झाल्याचे करवा यांच्या लक्षात आले.
करवा यांनी आपल्या नातेवाइकाला घेऊन एरंडोल गाठले. मानुधने यांच्याकडे पैशाची मागणी केली असता. त्यांनी माझ्याकडे पैसे नाहीत काय करायचे करा, असे म्हणत शिवीगाळ करून धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून मनोज मानुधने व दोन ट्रक चालकांच्या विरोधात साखरेची परस्पर विल्हेवाट लावून 8 लाख 95 हजार 779 रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

No comments:

Post a Comment