तोफखाना पोलीस ठाण्यातील पदोन्नती प्राप्त कर्मचार्‍यांचा सत्कार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 24, 2021

तोफखाना पोलीस ठाण्यातील पदोन्नती प्राप्त कर्मचार्‍यांचा सत्कार.

 तोफखाना पोलीस ठाण्यातील पदोन्नती प्राप्त कर्मचार्‍यांचा सत्कार.

जिल्ह्यातील 503 पोलीस कर्मचार्‍यांना प्रमोशन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर जिल्ह्यातील पोलीस हवालदार ते सहायक पोलीस उपनिरीक्षक 107, पोलीस नाईक ते पोलीस हवालदार 189 आणि पोलीस शिपाई ते पोलीस नाईक अशा 207 कर्मचार्‍यांसह एकूण 503 पोलीस कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात आली असून जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस खात्यातील पदोन्नतीचा विषय मार्गी लावलेला आहे, ज्यांना या पदोन्नत्या मिळालेल्या आहेत त्यांनी आगामी काळामध्ये आपल्या पदाची जबाबदारी ओळखून कामामध्ये कौशल्य मिळवावे असे प्रतिपादन शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी केले आहे.
शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यातील 22 पोलिस कर्मचार्‍यांची पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शहराचे उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे व तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे म्हणाले की, जिल्ह्यामध्ये पोलीस दलातील अनेक जणांना पदोन्नती देण्याचा विषय पोलीस प्रशासनाने हाती घेतलेला होता पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील 503 जणांना पदोन्नती दिली आहे. नगर जिल्ह्यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांच्या पदोन्नतीचा विषय सुरू होता अनेकांना पदोन्नती मिळाली नाही पदोन्नती देण्यासंदर्भात विषय जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील  यांनी गेल्या आठवड्यामध्ये जाहीर केला होता त्यानुसार या पदोन्नत्या देण्यात आलेल्या आहेत. पदोन्नती प्राप्त सर्व कर्मचार्‍यांना फिट व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आली सर्व कर्मचार्‍यांनाचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तोफखाना पोलीस ठाण्यातील 22 कर्मचार्‍यांना पदोन्नती प्राप्त झाली यामध्ये सहाय्यक फौजदार पदी गिरीष केदार, पोलीस हेड कॉन्सटेबल पदी विक्रम वाघमारे, प्रदीप बडे, महेश विधाते, यशोदास पाटोळे, मुश्ताक शेख, सुनील आंधळे, संतोष गर्जे, सुनील शिरसाठ आदी सर्वांची पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हणून पदोन्नती झाली, तसेच पोलीस नाईक पदी जावेद शेख, सलीम शेख, आदिनाथ वामन, शैलेश गोमसाळे, संभाजी बडे, तन्वीर शेख, शिरीष तरटे, साईनाथ सुपारे, प्रियांका राऊत, संपदा तांबे, जिजाबाई खुंडे, सविता मुटकुळे, चित्रलेखा साळी आदी सर्वांची पोलीस नाईक पदी पदोन्नती करण्यात आली असल्याची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दिली.

No comments:

Post a Comment