पारनेर मध्ये होणार कोरोनाचं “जीनोम सिक्वेन्सिंग” - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 8, 2021

पारनेर मध्ये होणार कोरोनाचं “जीनोम सिक्वेन्सिंग”

 पारनेर मध्ये होणार कोरोनाचं “जीनोम सिक्वेन्सिंग”

कोरोनाचा बायोडाटा शोधा मुख्यमंत्र्यांचे आदेश..


मुंबई -
विषाणूंच्या सर्व गुणसूत्रांवरील, सर्व जनुकांचा डिऑक्सीराय बोन्यूक्लिक ऍसीड संरचना, त्यांचे स्थान, क्रम, कार्यप्रकार, जाळे, विकृती यांची इत्यंभूत माहिती देणारा आराखडा म्हणजे “जीनोम सिक्वेन्सिंग” सोप्या भाषेत म्हणावं तर कोरोना व्हायरस कसा आहे? त्याचा बायोडाटा शोधणं म्हणजे “जीनोम सिक्वेन्सिंग” पारनेर तालुक्यात कोरोनाचं “जीनोम सिक्वेन्सिंग” करून घ्या असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
पॉझिटिव्हिटी दर जास्त असलेल्या कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात केलेल्या उपाययोजनांनंतरच्या स्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी काल आढावा घेतला. यात सर्वच जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर तुलनेने कमी होत असल्याचं जिल्हाधिकार्‍यांनी सांगितलं. हा दर आणखी कमी करण्यासाठी ठढझउठ चाचणीची संख्या वाढवणे, गृह विलगीकरण कमी करून संस्थात्मक उपचाराला गती, लसीकरण वाढवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांनी दिली. नगर जिल्ह्यात जिनोम सिक्वेन्सिंग करा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी अहमदनगर  जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जनुकिय उत्प्रवर्तन (जिनोम सिक्वेन्सी) करून घ्या, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिला. होमगार्ड नियुक्त्या, फिरती चाचणी केंद्रे आणि इतर आरोग्य सुविधांविषयक मागणीचा ज्या जिल्ह्यांनी उल्लेख केला त्यांच्या मागणीची दखल घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. डर्र्शिींशपलळपस हा एखाद्या विषाणूचा बायोडाटा असतो. एखादा विषाणू कसा दिसतो, कसा आहे याची माहिती या माध्यमातूनच मिळते. याच विषाणूच्या विशाल समूहाला जीनोम म्हटलं जातं. विषाणूबाबत जाणण्याच्या प्रक्रियेला जीनोम सिक्वेन्सिंग म्हणतात.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here