कत्तलखान्यात नेत असलेल्या गाईंची सुटका. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 13, 2021

कत्तलखान्यात नेत असलेल्या गाईंची सुटका.

 कत्तलखान्यात नेत असलेल्या गाईंची सुटका.

प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल.


कर्जत -
कत्तलीसाठी नेत असलेल्या खिलारी जातीच्या 5 गायी महिंद्रा बोलेरो वाहनात आढळल्यानंतर कर्जत पोलिसांनी तुफेल इसाक शेख वय 22 रा खडकत ता. आष्टी जि बीड याचेवर प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून गाईंची सुटका करून गाईसह 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि जवान हे कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना श्रीगोंदा ते जामखेड जाणारे रोडवर पिर फाटा तालुका कर्जत येथे एक महिंद्रा बोलेरो गाडी येताना दिसली. त्या गाडीस थांबवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव तूफेल इसाक शेख असे सांगितले. सदर गाडी मध्ये काय आहे अशी चौकशी केली असता त्याने समाधान कारक उत्तर दिले नाही, म्हणून पोलिसांनी सदर गाडीची पाहणी केली. त्यात पाच खिल्लारी जातीच्या गाई दिसल्या. अधिक सखोल विचारपूस केली असता सदरच्या 5 खिलार गायी या कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचेवर कर्जत पोलीस ठाण्यात प्राण्यांना निर्दयपणे वागविणे आणि प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायींची सुटका करून त्यांना गोशाळेत दाखल करण्यात आले. 300,000 रु किमतीचा पीक अप आणि 1,00,000 रु किमतीच्या गायी असा गायींसह 4,00,000 रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील अहमदनगर जिल्हा, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखालीपोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने पोलीस जवान पांडुरंग भांडवलकर, गोवर्धन कदम, सुनील खैरे, श्याम जाधव, मनोज लातूरकर, महिला पोलीस जवान राणी पुरी यांनी केली आहे.


No comments:

Post a Comment