मला संपविण्याचा प्रयत्न झाला... पण मी संपणार नाही. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 13, 2021

मला संपविण्याचा प्रयत्न झाला... पण मी संपणार नाही.

 मला संपविण्याचा प्रयत्न झाला... पण मी संपणार नाही.

भाजपा नेत्या पंकजा मुंढेंनी साधला समर्थकांशी संवाद...


मुंबई :
माझ्या बापाचे स्वप्न काय होतं, भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, हे होते. त्यांनी महाराष्ट्रात यात्रा करत तो पिंजून काढला. गोपिनाथ मुंडे यांनी समाजाच्या ऋणात राहून तळागळात काम केले. तळागाळातील कार्यकर्त्याला स्थान मिळाले पाहिजे, यासाठी त्यांनी काम केले. तुमच्या प्रेमाच्या ऋणात मी आहे. जनतेची कामं करण्यासाठी मी राजकारणात आले आहे. कुठलंही पदी मिळण्यासाठी मी राजकारणात आलेली नाही. जनतेची कामे करण्यासाठी मी राजकारणात आहे. मी हरले. मला संपविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मी संपणार नाही. कारण तुम्ही आहेत. मला सत्तेची लालसा नाही, कुठलंही अपेक्षा नाही. तुमच्या प्रेमाच्या ऋणात मी आहे. जनतेची कामं करण्यासाठी मी राजकारणात आले आहे. कुठलंही पदी मिळण्यासाठी मी राजकारणात आलेली नाही. मला दबाबतंत्र कायरचे असते तर या दबाबतंत्र करायला ही जागा पुरणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे यांनी आज केला.
केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांचा समावेश न झाल्याने राज्यातील मुंढे समर्थकांनी राजीनामा सत्र सुरू केले होते. आज भाजपा नेत्या पंकजा मुंढे यांनी या सर्व समर्थकांची समजूत काढत सर्व राजीनामे ना मंजूर करीत असल्याचे सांगत समर्थकांशी संवाद साधला.
यावेळी आम्ही नाराज आहेत, असे म्हणत कार्यकर्ते घोषणा देत होते. माझ्या डोळ्यातील पाणी बघून तुम्ही असे वागले असाल,  दबावतंत्र करायला ही जागा पुरणार नाही, आम्ही कोणाच्या पुढे काही मागायला गेले नाहीत. आपल्याला जर चांगले दिसलं नाही तर डोळे चोळून बघतो. त्यामुळे आता थोडे डोळे चोळून बघूया. पक्षाने जे दिले ते मी लक्षात ठेवेल , पण मला काय दिले नाही तेही लक्ष ठेवा. केंदीय मंत्री नसले तरी मी राष्ट्रीय मंत्री आहे असेही त्या म्हणाल्या. राजीनामे नामंजूर करत आहेत. प्रवास खडतर आहे. मी हरले आहे पण संपले नाही. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. जनतेच्या मुख्यमंत्री म्हणाले म्हणून जड गेले, असे सगळं म्हणतात. कोण म्हणते मला पंतप्रधान व्हायचे आहे ते चालते का. धर्मयुद्ध टाळायचा प्रयत्न करते जोवर शक्य तोवर. आपले घर आपण का सोडायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पंकजा मुंडे आणि बिडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी आता कार्यकर्त्यांची संवाद साधला यावेळी त्यांनी पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता फेटाळून लावली. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी तळागाळापर्यंत पक्ष पोहोचवला. काँग्रेसची सत्ता असतानाही त्यांनी राज्यात मोठं काम केलं. त्यामुळे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्याने भाजपचे अनेक पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यातही प्रीतम मुंडे दुसर्‍यांदा निवडून आल्या तर भागवत कराड एका वर्षापूर्वीच खासदार झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या दोघंही मुंडे भगिनी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. त्यामुळे मुंडे समर्थक नाराज होणं स्वाभाविक आहे. याच वेळी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी भेटीचे आयोजन आज (13जुलै) केलं होत. आणि आजच्या भेटीसाठी तमाम महाराष्ट्रातील कार्यकर्ते या ठिकाणी जमले आहेत, पुढे बोलताना पंकजा मुंडे असेही म्हणाल्या की, इथे स्टेज छोटा आहे मात्र मी माझा कार्यकर्त्यांचे पाया पडून ऋण फेडू इच्छिते असं देखील मुंडे कार्यकर्त्यांसमोर व्यक्त झाल्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न होतं की प्रत्येक सामान्यातल्या सामान्य माणसाला मंच उपलब्ध करून द्यायचं हेच त्यांचे ध्येय होतं. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने तमाम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि बीडमध्ये राजीनामासत्र देखील सुरू होतो आतापर्यंत 77 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आणि त्यानंतर पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांना कार्यकर्ते भेटलेत, याप्रसंगी पंकजा मुंडे असं देखील म्हणाल्या मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलंय ते म्हणजेच सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी मला मंत्री करा संत्री करा माझ्या बहिणीला अर्थातच प्रीतमला काही करा असे संस्कार दिवंगत मुंडे साहेबांनी आम्हाला दिले नाहीत असेदेखील म्हणायला पंकजा मुंडे विसरल्या नाहीत.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीत महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्त्याला धीर दिला आहे माझं कुटुंब म्हणजे तमाम माझे कार्यकर्तेच आहेत असं म्हणत कार्यकर्त्यांच्या मनात पंकजा यांनी घर केलंय, गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही असेदेखील सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात डावलण्यात आल्याने तमाम महाराष्ट्रातील कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी राजीनामासत्र देखील गेल्या दोन दिवसांपासून सुरू केलं होतं मात्र या कार्यकर्त्यांच्या भेटीत पंकजा मुंडे यांनी सर्व पदाधिकार्‍यांचे कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर देखील केले. पंकजा मुंडे यांनी सर्व पदाधिकार्यांचे राजीनामे नामंजूर करून आता सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

No comments:

Post a Comment