जिल्हा सत्र न्यायलयाने फेटाळलेला अटकपूर्व जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने केला मंजूर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 19, 2021

जिल्हा सत्र न्यायलयाने फेटाळलेला अटकपूर्व जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने केला मंजूर

 जिल्हा सत्र न्यायलयाने फेटाळलेला अटकपूर्व जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने केला मंजूर

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
कर्जत ः गेली दीड वर्ष गाजत असलेल्या अल्पवयीन प्रेमी युगलांच्या प्रकरणाला दिवसेंदिवस वेगवेगळी वळणे मिळत असून श्रीगोंदा जिल्हा सत्र न्यायालयाने सज्ञान म्हणून फेटाळलेला आरोपीचा अटकपूर्व जामीन औरंगाबाद खंडपीठाने तुर्तातूर्त मंजूर केला असून सदर गुन्ह्यामधील मुख्य आरोपीला अटक न करता बाल न्यायालयापुढेच पोलिसांनी हजर करावे असे आदेश दिले आहेत.
कर्जत तालुक्यातील नवसरवाडी येथील अल्पवयीन मुलाने कर्जत येथील अल्पवयीन मुलीबरोबर प्रेम संबंधातून पळून जावून 15 जाने 2020 रोजी लग्न केले होते, ते 15 फेब्रु 2020 रोजी हे प्रेमी युगल पळून गेले व त्यांनी  शिरूर येथे संसार थाटला दरम्यान अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली सदर मुलीचा गर्भपात शिरूर येथील डॉ चोरे याचे हॉस्पिटलला करण्यात आला. दरम्यान सदर मुलाने 30 डिसें 2020 रोजी सदर मुलीला कर्जतला सोडून तो पळून गेला, असता मुलगी आपल्या आई वडिलांच्या घरी गेली, यानंतर या  अल्पवयीन मुलीने सदर मुलाविरुद्ध जवाब देत पोलिसांकडे आपल्यावर अत्याचार झाल्याची कैफियत मांडली, यावरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध बलात्कार, पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल केले, सदरील अल्पवयीन आरोपीने जून 2021 मध्ये अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. सदरील अर्ज जिल्हा सत्र न्यायालय श्रीगोंदा यांनी आरोपी हा सज्ञान आहे म्हणून फेटाळून लावला, मात्र दरम्यान या गुन्ह्यात पोलिसांच्या तापासाबाबत गंभीर आक्षेप नोंदवत तपासी अधिकारी अमरजीत मोरे, यांचे सह पोलीस यंत्रणेवर ताशेरे ओढले होते व या प्रकरणात थेट पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना तपासाचे आदेश दिले होते, त्यानंतर सदर प्रकरणाचा तपास हा श्रीगोदा येथील पोलीस निरीक्षक डिकले यांचे कडे सोपविण्यात आला, सदर प्रकरणात डिकले यांनी न्यायालयाच्या आदेशाने डॉ. चोरे यांना आरोपी केले, दरम्यान न्यायलायने सदर आरोपी मुलास सज्ञान असल्याने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला, तद नंतर मुख्य आरोपीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये ऍड राहुल कर्पे व ऍड आकाश हाळनवर यांच्या मार्फत अटकपूर्व जामीनासाठी जुलै 2021 मध्ये अर्ज करण्यात आला. कोर्टापुढे जोरदार युक्तिवाद करत सदर गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा घडते वेळी अल्पवयीन होता त्यामुळे औरंगाबाद खंडपिठाने जिल्हा सत्र न्यायलयाचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याचा निर्णय रद्द करून सदरील अल्पवयीन मुलास तुर्तातूर्त अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. या आदेशानुसार पोलिसांनी सदर अल्पवयीन मुलास अटक न करता बाल न्यायालयापुढे विधी संघर्षीत बालक म्हणून हजर करावे असा आदेश दिला आहे.

No comments:

Post a Comment