आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रवरासंगम शाळेतील बालचिमुकल्यांचा ऑनलाईन रंगला दिंडी सोहळा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 19, 2021

आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रवरासंगम शाळेतील बालचिमुकल्यांचा ऑनलाईन रंगला दिंडी सोहळा

 आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रवरासंगम शाळेतील बालचिमुकल्यांचा ऑनलाईन रंगला दिंडी सोहळा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः
 आषाढी एकादशीच्या निमित्ताने  नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम जिल्हा परिषद  शाळेतील बालचिमुकल्यांनी वारकरी परंपरा जपत वेशभूषा करून ऑनलाइन दिंडी सोहळा साजरा करण्यात आला.पुंडलिक वरदा हरी विठ्ठलाच्या गजराने हा दिंडी सोहळा चांगलाच रंगला. यावेळी तुळशीचे पावित्र्य जपण्यासाठी रोप लावून वृक्षारोपण ही केले शाळेच्या शिक्षिका सुनीता कर्जुले यांच्या पुढाकाराने हा  आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
प्रवरासंगम जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन उपक्रमात  उत्साहाने  सहभाग नोंदवला यात त्यांनी वारकरी,विठ्ठल रुक्मिणी, यांची वेशभूषा करून संप्रदायातील परंपरेचे दर्शन घडविले.बाल वारकर्‍यांनी भागवत धर्माची पताका  खांद्यावर  घेऊन . .टाळ चिपळयाचा  गजर व विठूनामाचा जयघोष करत ऑनलाईन दिंडीद्वारे  घरीच राहून आषाढी एकादशीचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी एक तुळस अंगणी लावू,तिचे पावित्र्य  ठेवू..शुद्ध  हवा आपण घेऊ ,रोगाला पळवून लावू असे फलक हाती घेऊन औषधी गुणधर्म असलेल्या तुळशीचे वृक्षारोपण अंगणात केले.यावेळी प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याने एक तुळशीचे  रोप  लावले...तुळस ही पवित्र स्थानी मानली जाते, शिवाय ब-याच आजारावर उपाय म्हणून वापर केला जातो.  तुळस ही ऑक्सीजन जास्त प्रमाणात  देणारी  वनस्पती व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी  पडते असे महत्व  उपक्रमशिल आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या वर्ग शिक्षिका सौ.सुनिता कर्जुले-राऊत,मॅडम  यांनी  सांगितले या उपक्रमाला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या उपक्रमांचे  परिसरात  विशेष कौतुक  होत आहे.अशा  उपक्रमांतून विद्यार्थी,संस्कार संतांची परंपरा तसेच  वैज्ञानिक दृष्टिकोन ही वाढीस लागण्यास निश्चित  मदत होणार  आहे. विठ्ठल  व रुक्मिणी च्या  वेशभूषेत  शिवतेज सुनिल शिंदे व  रूपेक्षा संदीप पांडव हे होते.तर या  दिंडी उपक्रमात 23 विद्यार्थी  सहभागी झाले होते.  या उपक्रमांचे  प्रवरासंगमच्या सरपंच सौ.अर्चनाताई सुडके, मार्गदर्शक संदीप सुडके,उपसरपंच सौ.गाडेकर ताई  शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष  बाबासाहेब  भालेराव यांनी  भरभरून कौतुक केले.

No comments:

Post a Comment