नेवासा फाटा येथे काही व्यापार्‍यांना सक्ती तर काहींना रोजचीच व्यापारासाठी मुक्ती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, July 6, 2021

नेवासा फाटा येथे काही व्यापार्‍यांना सक्ती तर काहींना रोजचीच व्यापारासाठी मुक्ती

 नेवासा फाटा येथे काही व्यापार्‍यांना सक्ती तर काहींना रोजचीच व्यापारासाठी मुक्ती


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः महाराष्ट्र शासनाने नवीन आलेल्या  डेल्टा  प्लस या आजाराच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध जाहीर केले  संपूर्ण महाराष्ट्रामध्ये  मेडिकल वगळता  सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते चार  या वेळी  दुकाने आणि हॉटेल चालू ठेवण्यास परवानगी   दिली.तसेच शनिवार आणि रविवार सर्वच व्यापार मेडिकल वगळता बंद ठेवण्याचे आदेश दिले.
मोठ्या मोठ्या शहरांत याची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत आहे  परंतु नेवासा फाटा मात्र शासनाच्या या निर्णयाला केराची टोपली दाखवताना दिसत आहे .अनेक व्यापारी जरी आपली दुकाने चार वाजेला बंद करण्यामध्ये प्राधान्य देत असले  तरी काही व्यापारी मात्र अर्धे शटर ठेवून तसेच काही जण तर आपला व्यवसाय अक्षरशः रात्री सात ते आठ वाजेपर्यंत  संपूर्ण खुले शटर ठेवुन चालू ठेवत आहे।त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई पोलीस किंवा ग्रामपंचायत प्रशासन करताना अजून तरी आढळले नाहीत . त्यामुळे नियम पाळणार्या व्यावसायिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.सर्वांना एकसमान न्याय द्या अन्यथा आम्हीही आमची दुकाने चालू ठेवू असा इशारा आज नियम पाळणार्‍या व्यापार्‍यांनी  दिला.   पोलिस आणि प्रशासन  ताकीद देत असले तरीही  अजूनही चित्र बदलत नाही  काही व्यावसायिक तरआधी याचे दुकान बंद करा नंतर आम्हाला सांगा  अशाप्रकारे वाद घालताना दिसत आहेत .मुकिंदपूर ग्रामपंचायतीचे सरपंच सतीश दादा निपुंगे  यांनी बर्‍याच वेळा समज देऊन सुद्धा  यात काही फरक पडला नाही.  त्यामुळे येणार्‍या काही दिवसांत व्यावसायिक विरूध्द प्रशासन  असा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत .आता या परिस्थितीला आळा प्रशासन कसा घालणार  यावरच निर्बंधांचे चित्र अवलंबून असणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here