मा.आ.भीमसेन धोंडे यांची गुणवंत सुपुत्र घडविणार्‍या आई-वडिलांच्या पाठीवर शाबासकीची थाप ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 22, 2021

मा.आ.भीमसेन धोंडे यांची गुणवंत सुपुत्र घडविणार्‍या आई-वडिलांच्या पाठीवर शाबासकीची थाप !

 मा.आ.भीमसेन धोंडे यांची गुणवंत सुपुत्र घडविणार्‍या आई-वडिलांच्या पाठीवर शाबासकीची थाप !

अविनाशच्या आई-वडिलांना अक्षरशः गहिवरुन आले, आष्टीचा अविनाश साबळे ऑलिम्पिकसाठी जपानला रवाना...


नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः आई-वडिलांच्या कठोर जिद्द आणि मेहनतीच्या परिश्रमातून मुलांची जडणघडण होत असते किंबहुना कुठल्याही क्षेत्रातील यशवंत आणि गुणवंतांच्या यशामध्ये आई-वडिलांचा वाटा महत्त्वपूर्ण असतो हेच वास्तव ऑलिंपिकसाठी जपानमध्ये रवाना झालेल्या आष्टी येथील क्रीडापटूच्या बाबतीत घडले आहे.छोट्याशा खेड्यातून परदेशात झेप घेणार्‍या यशवंत आणि गुणवंतांची नव्हे तर त्यांना घडवणा-या आईवडिलांच्या पाठीवर शाबासकी देण्याचे भाग्य आष्टी,पाटोदा,शिरूर  विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. भीमराव धोंडे यांना लाभले आहे.
मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या मांडवा या छोट्याशा गावातून प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवलेल्या आणि अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये रममाण झालेले अविनाश साबळे या युवकाने क्रीडा क्षेत्रात आपले नैपुण्य दाखवत आपल्या भूमीचे मोठेपण सातासमुद्रापलीकडे नेले आहे.दि.23 जुलै पासुन स्पर्धा सुरु होत आहे.आंतरराष्ट्रीय आलिम्पिक स्पर्धेसाठी आष्टी तालुक्यातील मांडवा या छोट्या खेड्यातील अविनाश साबळे हा तरुण क्रिडापटू जपान देशातील टोकियो येथे नुकताच रवाना झाला आहे. मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील आष्टीच्या भूमिपुत्रांच्या या प्रचंड यशाबद्दल सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान क्रिडापटू अविनाश साबळे आणि त्यांचे आई-वडील यांच्या कठोर मेहनतीला आलेले हे फळ निश्चितच गौरवास्पद आहे. ही बाब लक्षात घेऊन आष्टीचे माजी आ.भीमसेन धोंडे यांनी थेट त्याचे मूळ गाव असलेल्या मांडवा येथे जाऊन त्याच्या राहत्या घरी जाऊन त्याला घडवणार्‍या त्यांच्या आई-वडिलांचे जाहीर कौतुक करीत अभिनंदन करून सन्मान करण्यात आला.याप्रसंगी हा सत्कार पाहून क्रिडापटू अविनाशच्या आई-वडिलांना अक्षरशः गहिवरुन आले!
आष्टीचे नाव जगाच्या कानाकोपर्‍यात नेणा-या क्रिडापटू अविनाश साबळे याच्या प्रथम गूरू ठरलेल्या माता पित्यांचे स्नेहपुर्ण कौतुक व अभिनंदन करत सत्कार करून पाठीवर शाब्बासकिची थाप देण्यात आली.यावेळी रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे,चेअरमन पोपटराव मुटकुळे,वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,ग्यानबा साळवे आदिसह मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment