नेवासा खुर्द मुलींच्या शाळेतील चिमुकल्यांनी आषाढी वारीचा ऑनलाईन लुटला आनंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 22, 2021

नेवासा खुर्द मुलींच्या शाळेतील चिमुकल्यांनी आषाढी वारीचा ऑनलाईन लुटला आनंद

 नेवासा खुर्द मुलींच्या शाळेतील चिमुकल्यांनी आषाढी वारीचा ऑनलाईन लुटला आनंद


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः  नेवासा शहरातील जिल्हा परिषदेच्या द असलेल्या मुलींच्या शाळेतील चिमुकल्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी परंपरा जपत वेशभूषा करून ऑनलाइन  आषाढी वारीचा आनंद लुटला.
विद्यार्थिनींचे शिक्षण हे आनंददायी व्हावे व त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या हेतूने आषाढी एकादशीचे निमित्त साधून इयत्ता पहिलीच्या मुलींसाठी विविध संत वेशभूषा हा उपक्रम उपक्रमशील शिक्षिका मनीषा जवणे- लोखंडे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला.यावेळी मुलींनी विविध संतांच्या वेषभूषा साकारल्या होत्या.या ऑनलाईन उपक्रमात ज्ञानदा पठाडे,आराध्या पवार,नुसरत देशमुख,माधवी व्यवहारे, गौरी जाधव,सानवी काथवटे,ओवी बोरकर,अवनी लोखंडे,ईश्वरी फाजगे, गार्गी सोनवणे,आराध्या जाधव, कृष्णा गरूटे,गौरी भांड,आरोही आलवणे यांनी विठ्ठल-रुक्मिणी,संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,संत मुक्ताबाई,संत जनाबाई,संत बहिणाबाई,संत रामदास,संत एकनाथ,संत नामदेव,संत गाडगेबाबा,वारकरी वेशभूषा यांची वेशभूषा करून संप्रदायातील परंपरेचे दर्शन घडविले व ऑनलाईन आषाढी एकादशीचा आनंद लुटला.या उपक्रमाला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कामी शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा गवळी, वर्गशिक्षिका मनीषा जवणे-लोखंडे,राजेश्री जोशी,मालनबाई कोळपकर,विजय साळुंके,वैशाली कुलट,प्रफुल्ल भागवत,ज्योती बोरूडे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment