स्नेह 75 च्या वतीने राष्ट्रीय डॉक्टर व कृषी दिनानिमित्त डॉक्टर व कृषी तज्ञाचा सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 1, 2021

स्नेह 75 च्या वतीने राष्ट्रीय डॉक्टर व कृषी दिनानिमित्त डॉक्टर व कृषी तज्ञाचा सन्मान

 स्नेह 75 च्या वतीने राष्ट्रीय डॉक्टर व कृषी दिनानिमित्त डॉक्टर व कृषी तज्ञाचा सन्मान


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  नगर कोरोना काळात डॉक्टर व शेतकर्‍याचे काम अत्यंत महत्वाचे होते. शेतकऱी हा निसर्गाशी झुंजत प्रतिकूल परीस्थितीत शेतात सोन पिकवणारा हा भूमिपूत्र आहे तर डॉक्टरानी अनेकांचे जीव वाचवले. समाजाप्रती असलेली सात्विक वृत्ती, निरपेक्ष भावना या गोष्टी डॉक्टर व शेतकर्‍या च्या माध्यमातून पाहयला मिळत आहे. त्यामुळे डॉक्टर व शेतकरी हे दोन्ही समाजाचे देवदूतच आहेत  असे प्रतिपादन स्नेह 75 चे किशोर रेणावीकर यांनी केले.
स्नेह 75 च्या वतीने राष्ट्रीय डॉक्टर व कृषी दिनानिमित्त  डॉ. विनोद सोळंकी, डॉ. प्रविण रानडे व कृषी तज्ञ दिनेश गुगळे यांचा सन्मान स्नेह 75 चे किशोर रेणावीकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विश्वनाथ पोंदे, देवेंद्र डावरे, सौ. जयश्री डावरे, अजित चाबुकस्वार, मंगेश कुलकणी, रजनी ढोरजे, ईश्वर सुराणा आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. विनोद सोळंकी म्हणाले की, कोव्हिड काळात अनेकांचे अल्प दरात तपासण्या करून त्यांना घरीच बरे केले.त्यांनी मानसिक आधार, धैर्य दिले. विविध चाचण्याही केल्या स्नेह 75 या ग्रुपने दिलेली शाबासकीची थाप महत्वाची आहे. दिनेश गुगळे म्हणाले की,स्व. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ आजचा दिवस हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.ते राज्यातील हरित क्रांतीचे जनक होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here