कै. वसंतराव नाईक यांनी पाहिलेले हरितक्रांतीचे स्वप्न साकार - राजश्री घुले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 1, 2021

कै. वसंतराव नाईक यांनी पाहिलेले हरितक्रांतीचे स्वप्न साकार - राजश्री घुले

 कै. वसंतराव नाईक यांनी पाहिलेले हरितक्रांतीचे स्वप्न साकार - राजश्री घुले

कृषिदिनी उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान, कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कै. वसंतराव नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सर्वांत जास्त काळ काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात कृषी विधायक धोरण, महिला शेतकर्यांचे सक्षमीकरण व विविध योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या. कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी त्यांनी बहुमोल योगदान दिले. राज्याला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. दूरदृष्टी असलेले कै. नाईक यांची जयंती कृषिदिन म्हणून साजरी केली जाते. कै. नाईक यांनी पाहिलेले हरितक्रांतीचे साकार झाले आहे, असे प्रतिपादन जि. प. अध्यक्षा राजश्री घुले यांनी केले.
कृषी विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषिदिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी जिल्ह्यातील शेतकर्यांना उत्कृष्ट शेतकरी पुुरस्कार जि. प. अध्यक्षा राजश्री घुले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी सौ. घुले बोलत होत्या. याप्रसंगी सभापती काशिनाथ दाते, मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, कृषी उपसंचालक विलास नलगे, कृषी विकास अधिकारी सुनीलकुमार राठी, तंत्र अधिकारी अशोक डमाळे, कृषी अधिकारी प्रमोद साळवे, प्रवीण गोरे, कौस्तुभ कराळे, प्रकाश महाजन आदी उपस्थित होते. यावेळी कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप करण्यात आला.
सौ. घुले पुढे म्हणाल्या की, भावी काळात नुसते अन्नधान्य उत्पादन घेण्यावर भर न देता दर्जेदार व गुणात्मकतेवर लक्ष केंद्रीत करावे लागेल. शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी विविध विद्यापीठे, संस्था यांच्याकडून दिवसेंदिवस नवनवीन शोध मोहीम सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले असून, त्याला चांगले यश येत आहे. जमिनीतील कार्बाचे प्रमाण कमी होत असून, त्यासाठी सेंद्रिय खते व शेणखताचा वापर वाढवणे गरजेचे आहे. जैविक खतांचा वापर, बीजप्रक्रिया व पेरणी वेळी खते देण्याकडे शेतकर्‍यांचे दुर्लक्ष होते. त्यासाठी विस्तार यंत्रणेने अधिक प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
सभापती काशिनाथ दाते म्हणाले की, कै. नाईक यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात कृषीविषयक धोरण योजना मोठ्या प्रमाणात राबवून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. त्याचा चांगला परिणाम झाला. महाराष्ट्र अन्नधान्य उत्पन्नात स्वयंपूर्ण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कै. नाईक यांच्यावर शेतकर्यांचा गाढा विश्वास होता. तो त्यांनी सार्थ ठरविला. जि. प. कृषी व पशुसंवर्धन विभाग शेतकर्यांना शेतीसाठी आवश्यक अवजारे साहित्य अनुदानावर पुरविते. मागणी असलेल्या बियाणे व खतांचा वेळेत पुरेसा पुरवठा होण्यासाठी कार्यवाही केली जाते, असे त्यांनी सांगितले.
कृषी विभाग आत्माअंतर्गत नाथा देशमुख, सतीश पालवे, नवनाथ सायकर, अविनाश लहाणे, संजय वागस्कर, रामेश्वर जगताप, ताराचंद गागरे, बाळासाहेब खरात, शांताराम बारामते, सौ. मीनाक्षी निर्मल यांना व कृषी विभागाच्या वतीने भानुदास थोरात, पांडुरंग कर्डिले, बबन पागिरे, हरिभाऊ म्हस्के, देवीदास खाटिक, कृष्णा परदेशी, धनराज पवार, आबासाहेब वावरे, महेश म्हस्के या शेतकर्यांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांतीलाल ढवळे यांनी केले, तर आभार सुनीलकुमार राठी यांनी मानले.

No comments:

Post a Comment